तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:13 PM2019-12-13T23:13:48+5:302019-12-13T23:14:22+5:30
धुळे : शहरी व ग्रामीण गटातून उत्स्फूर्त सहभाग, मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक देऊन विजेत्यांचा गौरव
धुळे : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा १३ रोजी समारोप करण्यात आला. यावेळी विजेत्यांचा मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
तालुक्यातील गोंदूर येथील ओंकार बहुउद्देशीय विकास संस्था संचलित प्रा.रवींद्र निकम ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सच्या प्रांगणात ११ ते १३ डिसेंबर दरम्यान तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांतून शहरी व ग्रामीण गटातून ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने अनेक नवनवीन उपकरण सादर केली. परीक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार उत्कृष्ट उपकरणांची पुढील प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १३ रोजी दुपारी ३ वाजता मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्थेच्या प्राचार्या डॉ.विद्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तर समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शुभांगी निकम होत्या. व्यासपीठावर ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा.रवींद्र ओंकार निकम, संस्थेचे सदस्य रोहित निकम, शिक्षणाधिकारी (निरंतर) जि.प. धुळे) किरण कुवर, गटशिक्षणाधिकारी पुष्पराज शिंदे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय बोरसे, सचिव के.बी. नांद्रे, अध्यक्ष पी.झेड. कुवर, संजय पवार, सी.टी. पाटील, जे.बी. सोनवणे, बी.एम. अहिरे, सुनील पाटील, विनोद रोकडे, प्रा.भागवत पाटील, आर.के राजपूत, एस.ए. जाधव, प्राचार्य प्रकल्प पाटील, प्राचार्य डॉ.राजेश अहिरराव, प्राचार्य सागर जाधव, प्राचार्य चेतन पवार आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा.शुभम ठाकरे यांनी केले. आभार प्रा.नमिता जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.