दुपारी एक वाजेपर्यत निकाल लागण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:35 PM2019-10-22T23:35:09+5:302019-10-22T23:35:30+5:30

विधानसभा निवडणूक : पाचही मतदार संघाचा आज निकाल

Expect results until around noon | दुपारी एक वाजेपर्यत निकाल लागण्याची शक्यता

dhule

Next

धुळे/ शिरपूर : विधानसभा निवडणूकीसाठी गुरूवारी पाच मतदान संघासाठी सकाळी ८ वाजता मत मोजणी होणार आहे़ पहिली फेरीचा निकाल अवघ्या अर्धातासानंतर तर उर्वरीत सर्व निकाल दुपारी १ वाजेपर्यंत लागण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे़
विधानसभा निवडूणकीसाठी पाच मतदान संघातील ३८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे़ त्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील १ हजार ६९५ मतदान केंद्रावर मतदान पार पडले़ पाचही मतदान संघापैकी सर्वाधिक मतदान शिरपूर मतदारसंघात ७० टक्के झाले़ तर त्याखालोखाल धुळे ग्रामीण ६४.२० टक्के, साक्रीत ६२.२० टक्के, शिंदखेडा ६२.२० टक्के तर सर्वात कमी मतदान धुळे शहर मतदारसंघात ५०.२० टक्के मतदान झाले आहे़
या ठिकाणी होईल मतमोजणी
२४ रोजी सकाळी ८ वाजता पाचही मतदार संघात मतमोजणी होणार आहे़ त्यात धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदान संघाची नगावबारी येथील शासकीय धान्य गोडाऊन येथे मतमोजणी होणार आहे़ तर साक्री मतदान संघाची शेवाळी फाटा येथील शासकीय धान्य गोडाऊन, शिंदखेडा येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्थे जवळ तर शिरपूर मतदान संघाची मतमोजणी करवंद नाक्याजवळील मुकेशभाई पटेल टाऊन हॉलमध्ये होईल़ मतमोजणीच्या चोहोबाजूंनी पत्रा लावून आतील भागात जाळी बसविण्यात आली आहे़ मतदान हॉलमध्ये असल्यामुळे यंदा मतमोजणी बाहेर करण्यात आल्याचे सांगण्यात आले़ मतमोजणी हॉलला चोहोबाजूंनी पोलिसांचा बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़
५ मतदान संघासाठी १७ टेबल
मतदान संघात मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पुर्णत्वास आली आहे़ पाचही ठिकाणी १७ फेऱ्या होणार आहे़ तासाभरानंतर पहिला फेरीचा निकाल जाहीर केला जाणार आहे़ तर दुपारी १ ते २ वाजेपर्यत निकाल लागण्याची शक्यता आहे़
मोबाईला बंदी
मतमोजणी ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधींना देखील मोबाईल सोबत बाळगण्यावर बंदी घातली आहे़ कदाचित त्यांच्याकडे मोबाईल आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे़ शक्यतोवर पोलिस अधिकारीच मतमोजणी ठिकाणी आत घेतांना मोबाईल व अन्य वस्तु तपासूनच पाठविणार आहेत़
शिरपूरची अशी होईल प्रक्रिया
मतमोजणीसाठी २४ फेऱ्यांमध्ये होणार असून त्याकरीता १४ टेबल लावली जाणार आहेत़ प्रत्येक टेबलावर ३ अधिकारी-कर्मचारी असणार आहेत़ तसेच याठिकाणी बंदोबस्तासाठी महाराष्ट्र पोलिसांसह सीआयएफ व एसआरपीएफ पथकाचे कर्मचारी देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत़
सुरूवातीला पहिल्या फेरीचा निकाल लागायला वेळ लागेल, तोही ८़३० वाजेपर्यंत अपेक्षित आहे़ त्यानंतर पुढील फेरींचा वेग वाढेल़ एकूण २४ फेºया होणार असल्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहे़
निवडणूक निरीक्षकांची भेट़़
राज्याचे निवडणूक मतमोजणी निरीक्षक ज्युतसिंग हे गुरूवारी मतमोजणीच्या दिवशी भेट देणार आहेत़
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ़ विक्रमसिंह बांदल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार आबा महाजन, अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा सीईओ अमोल बागुल यांनी मतमोजणी सुव्यवस्थेत व शांततेत पार पाडण्यासाठी सुसज्ज व्यवस्था केली आहे़

Web Title: Expect results until around noon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे