ग्रामीण विकासात बँकेच्या योगदानाची अपेक्षा - सुभाष भामरे
By admin | Published: May 28, 2017 01:32 PM2017-05-28T13:32:05+5:302017-05-28T13:32:05+5:30
शिखर बँकेच्या धुळे शाखेचे उद्घाटन, बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.28 - शिखर बँकेने धुळ्यात शाखा उघडल्यामुळे ग्रामीण विकासासाठी बँकेच्या योगदानाची अपेक्षा असून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, पीककर्ज देण्यास हातभार लावून बँकेने ग्रामीण विकासाला चालना द्यावी़ गेल्या पाच वर्षात बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला असून, ती गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी केल़े
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात शिखर बँकेच्या धुळे शाखेचे उद्घाटन शनिवारी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्या हस्ते झाल़े, त्या वेळी ते बोलत होत़े एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जितेंद्रसिंह रावल, बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ़ एम़एल़सुखदेवे, व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड उपस्थित होत़े या वेळी बोलताना डॉ़ भामरे म्हणाले की, 2011-12 मध्ये रिझव्र्ह बँकेने शिखर बँकेवर प्रशासकीय मंडळ बसविल़े 11 र्निबध बँकेवर घालण्यात आले होत़े मात्र, त्यानंतर गेल्या पाच वर्षात बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला़ शिखर बँकेला 104 वर्षाचा इतिहास असून बँकेला अलीकडे विस्ताराची संधी मिळत आहे, ही सर्वासाठी समाधानाची बाब आह़े माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी, शिखर बँकेने शेतक:यांना पीककर्ज देऊन जिल्हा बँकेच्या कामास हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली़ जितेंद्रसिंह रावल यांनी बँकेच्या भरभराटीच्या व अडचणीच्या काळाचे आपण साक्षीदार राहिल्याचे मत व्यक्त केल़े डॉ़ एम़एल सुखदेवे व प्रमोद कर्नाड यांनीही मनोगत व्यक्त केल़े