माळमाथा परिसरातील गवारची गुजरात राज्यात निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 12:37 PM2017-06-27T12:37:22+5:302017-06-27T12:37:22+5:30
सरासरी 80 रुपये किलोचा भाव : चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी
Next
ऑनलाईन लोकमत
जैताणे, दि.27 - साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील गवारला गुजरात राज्यातील बाजारपेठांमध्ये सरासरी 80 रुपये किलोचा भाव मिळत असल्याने समाधानी झालेल्या शेतक:यांनी गुजरात राज्यात त्यांनी उत्पादीत केलेली गवार निर्यातीवर भर दिला आहे. जैताणे परिसरातून सरासरी 80 वाहने दररोज गुजरात राज्यात गवार घेऊन जातांना दिसत आहेत.
खरीप हंगामाच्या प्रारंभी साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील शेतक:यांना गवारने चांगलाच आधार दिला. परिणामी, सद्य:स्थितीत अनेक शेतक:यांनी गवार लागवडीवर भर दिला आहे. साक्री तालुक्यातील जैताणे, खुडाणे, रोजगाव, विहिरगाव, दुसाणे, म्हसाळे, भामेर, आखाडे परिसरात गवारची लागवड सुरू आहे. गवार उत्पादीत करण्यासाठी खर्च कमी येत असल्याने हे पीक घेण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे कृषी सेवा केंद्राचे संचालल भूषण वाणी यांनी दिली. जैताणे, खुडाणे रोड चौफुली, वासखेडी रोड, आखाडे रोड, नागरवाडी परिसरात तसेच विहिरगाव फाटा गोकूलनगरी आदी ठिकाणी गवार खरेदी केंद्र खाजगी व्यापा:यांनी थाटली आहेत. याठिकाणी गवार विक्रीसाठी शेतक:यांची गर्दी होत असून सरासरी 35 रुपये किलोने खरेदी केली जाणारी गवार गुजरात राज्यातील नाडियाद, वडोदरा, अंकलेश्वर, नवसारी याठिकाणी निर्यात केली जात आहे.