पिक कर्जाची मुदत वाढवून शेतकऱ्यांना फेर कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:47 PM2020-05-21T20:47:10+5:302020-05-21T20:47:31+5:30

काँग्रेसची मागणी : भाजपचेही निवेदन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या, घरकुलांची संख्या वाढवा

Extend the term of crop loan and give re-loan to farmers | पिक कर्जाची मुदत वाढवून शेतकऱ्यांना फेर कर्ज द्या

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पिक कर्जाची मुदत वाढवून खरीप हंगामासाठी शेतकºयांना नव्याने कर्ज उपलब्ध करुन देण्याची मागणी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे़
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, शहर जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ, पोपटराव सोनवणे यांच्यासह पदाधिकाºयांनी गुरुवारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन दिले़
निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाउनमुळे बळीराजा संकटात सापडला आहे़ २४ मार्चपासून लॉकडाउन केल्यामुळे शेतकरी ३१ मार्चपर्यंत पिक कर्जाची परतफेड करु शकले नाहीत़ त्यामुळे आरबीयाने ३१ मेपर्यंत मुदत दिली़ परंतु सध्याचा लॉकडाउन ३१ मेपर्यंत कायम असल्याने शेतकरी आताही कर्जाची परतफेड करु शकत नाहीत़ ज्या शेतकºयांनी कर्जाची परतफेड केली आहे त्यांना नव्याने कर्ज मिळत आहे़
परंतु थकबाकीदार शेतकºयांचा प्रश्न निर्माण झाला आहे़ या शेतकºयांनी ३१ मेपर्यंत कर्जाची परतफेड केली नाही तर त्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्ज मिळणार नाही़ त्यामुळे जुने कर्ज फेडण्यासाठी आरबीआयने दिलेली ३१ मेपर्यंतची मुदत पुन्हा वाढवून मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ ही मागणी आरबीआयल कळविण्याची विनंती केली आहे़
दरम्यान, धुळे तालुक्यातील आर्वी गणाच्या पंचायत समिती सदस्या लता शेणगे यांनी पती जिभाऊ शेणगे यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांना गुरुवारी निवेदन दिले़
बेमोसमी पावसामुळे आर्वी, अनकवाडी आणि परिसरातील इतर गावांच्या शेतकºयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ सध्या खरीप हंगाम सुरु होत असल्याने या हंगामात शेतीची मशागत आणि पेरणी तसेच खते खरेदीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत याकरिता नुकसान भरपाई त्वरीत मिळावी अशी मागणी केली आहे़ पंचायत समिती सदस्या लताशेणगे यांनी आणखी एक निवेदन दिले असून अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीसाठी घरकुलांची संख्या वाढवून मिळण्याची मागणी केली आहे़
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री महिन्याभरानंतर धुळ्यात आल्याने विविध मागण्यांची निवेदने देण्यासाठी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी गर्दी केली होती़ खरीप हंगाम पूर्वतयारीची व्हीसीवरील आढावा बैठक झाल्यानंतर प्रशासकीय इमारतीमधून बाहेर पडलेल्या पालकमंत्र्यांनी चालतानाच निवेदन स्विकारली़

Web Title: Extend the term of crop loan and give re-loan to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे