धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 04:18 PM2018-02-23T16:18:07+5:302018-02-23T16:21:11+5:30
शासन आदेश : २८ फेब्रुवारीपर्यंत त्याच विभागात करावे लागणार काम
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : करमणूक कर विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचाºयांना तिसºयांदा मुदतवाढ मिळाली आहे. शासन आदेशानुसार या विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांना २८ फेब्रुवारीपर्यंत त्याच विभागात काम करावे लागणार आहे.
देशात १ जुलैला वस्तू व सेवा (जीएसटी) लागू झाला. या नवीन कर प्रणालीत करमणूक कराऐवजी सेवा कर आकारला जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर करमणूक कर शाखा बंद करून या शाखेतील कर्मचाºयांचे गौण खनिज विभागात समायोजन केले जाणार होते. तशा शासकीय पातळीवर हालचालीदेखील सुरू झाल्या होत्या. मात्र, शासनाने सुरुवातीला करमणूक कर विभागातील कर्मचाºयांना ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर पुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ जाहीर केली होती. त्यानंतर शासनस्तरावरून कुठलाही निर्णय येत नसल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचारी संभ्रामात पडले होते. नुकतेच शासन आदेश प्रशासकीय पातळीवर प्राप्त झाले आहे. त्यानुसार या विभागातील कर्मचाºयांना २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ पूर्ण झाल्यानंतर शासन काय निर्णय घेते? याकडे अधिकारी व कर्मचाºयांचे लक्ष राहणार आहे.