धुळ्यासह राज्यातील चारही जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:42 PM2018-12-28T13:42:00+5:302018-12-28T13:43:15+5:30
राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी दिले आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळ्यासह राज्यातील नंदुरबार, वाशिम, अकोला येथील जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी ३० डिसेंबर रोजी तर पंचायत समिती सदस्यांचा कालावधी २८ पूर्ण होत आहे. मात्र आरक्षणाच्यामुद्यामुळे निवडणुका होऊ न शकल्याने, विद्यमान सदस्यांचा कालावधी वाढविण्यात आल्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव संजय बनकर यांनी २७ रोजी रात्री पारित केले आहेत.
आरक्षणाच्या मुद्यावरून कायदेशीर पेच निर्माण झालेला होता. त्यामुळे राज्यातील चारही जिल्हा परिषदांवर प्रशासकाची नेमणूक होते की विद्यमान सदस्यांना मुदतवाढ मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील चारही जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढ दिली आहे. त्याबाबतचे आदेश २७ डिसेंबर रोजी पारित करण्यात आले आहेत. या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.