धुळे जिल्ह्यात मतदारांच्या पडताळणीसाठी मुदतवाढ; बीएलओंचा कामास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:08 AM2017-12-02T11:08:08+5:302017-12-02T11:09:51+5:30
जिल्हा निवडणूक शाखेसमोर पेच
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांमार्फत (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, मुदतवाढ मिळाली असली तरी प्राथमिक शिक्षकांनी आता बीएलओचे काम करण्यास नकार दिल्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेसमोर पेच निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात बीएलओंनी या कामावर बहिष्कार टाकला होता. तेव्हा उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाºयांशी चर्चा करून शिक्षकांना ३० नोव्हेंबरपर्यंत काम करण्याचे आवाहन केले होते. मात्र, पुन्हा बीएलओंनी कामास नकार दिला