प्रवासी प्लॅटफॉर्मवर शौचालय आणि मुतारीची सोय करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:41 PM2019-06-13T12:41:54+5:302019-06-13T12:46:10+5:30
दोंडाईचा रेल्वे स्थानक समस्या : वाणिज्य निरीक्षकांनी दिली रेल्वे स्थानकास भेट
दोंडाईचा : सुरत - भुसावल रेल्वे मार्गावरील दोंडाईचा रेल्वे स्थानकावरील विविध समस्यासंदर्भाय ‘लोकमत’ गेल्या तीन दिवसापासून वृत्तमालिका प्रसिद्ध केली आहे. त्याची दखल घेतले रेल्वे प्रशासनाचे वाणिज्य निरीक्षकांनी मंगळवारी दोंडाईचा रेल्वे स्थानकाला भेट दिली. पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रवासी प्लॅटफॉर्मवर लवकरच शौचालय व मुतारी सोय करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
दोंडाईचा रेल्वे स्थानकावरील विविध समस्या मांडल्या जात आहे. अपूर्ण कव्हरशेडमुळे कोटयावधी रुपयांची खते उघडयावर पडून असतात. प्रवासी प्लॅटफॉर्मवर प्राथमिक सुविधाचा अभाव, मालधक्यावर हमालासाठी सुविधांचा अभाव या समस्या प्रामुख्याने मांडल्यात. त्याची दखल रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक राजकुमार यांनी घेतली.
त्यांनी दोंडाईचा रेल्वे स्टेशनला प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष खुर्शीदभाई कादियानी, रेल्वे सल्लागार प्रवीण महाजन, संजय अग्रवाल यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्यात. त्यांना असलेल्या अधिकारात असलेल्या समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
त्यात स्टेशनचा मधल्या म्हणजे क्रमांक २ व 3 प्रवासी प्लॅटफॉर्मवर लवकरच शौचालय व मुतारीची व्यवस्था केली जाणार. डिजिटल टाईम टेबल सारखे टाईम टेबल लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पाण्याची व्यवस्था लवकरच केली जाईल . माझे अधिकार सीमित आहेत. अन्य समस्या उत्पन्नावर आधारित असल्यानेत्या वरिष्ठ अधिकारी कडे पाठवल्या जातील असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
जलद गाड्याचा डबा स्टेशनवर कुठे लागेल ते प्लेटफॉरवर निर्देशित केले जाणार आहे. वरिष्ठांच्या समस्यांबाबत रिपोर्ट करणार असल्याचे सांगितले.