अपयशातून घातली यशाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:45 PM2019-03-18T22:45:06+5:302019-03-18T22:45:35+5:30

आयपीएस अधिकारी होण्याचे ध्येय

Failure to be held for failure | अपयशातून घातली यशाला गवसणी

अपयशातून घातली यशाला गवसणी

Next

चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद
अतुल जोशी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
विद्यार्थी दशेपासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न होत. शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. भरपूर अभ्यास केला. मात्र दोनवेळा परीक्षा देवूनही पदरी अपयश आले. अपयशामुळे काहींच्या अपमानालाही सामोरे जावे लागले. मात्र प्रयत्न सोडले नाही. तिसºया प्रयत्नात यश मिळाले. कठोर परिश्रम, भरपूर अभ्यास केला तर हमखास यश मिळते असे महाराष्टÑ राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात महिला वर्गात प्रथम आलेल्या अश्विनी सुभाष हिरे (पिंपळनेर) यांनी  सांगितले. या यशाबद्दल ‘त्यांचा लोकमत’शी झालेला संवाद असा-
प्रश्न : स्पर्धा परीक्षांकडे कसे वळलात? 
उत्तर : इयत्ता नववी-दहावीत असतांनाच आपणही पोलीस अधिकारी व्हावे असे मनोमन ठरविले होते.  पिंपळनेर येथे घरी जाण्याचा रस्ता हा पोलीस स्टेशनवरूनच जायाचे. तेथील पोलीस स्टेशनला अधिकारी बघितले की त्यांच्या सारखे बनण्याची इच्छा व्हायची. त्यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.  
प्रश्न : यासाठी कोणाकडून प्रेरणा मिळाली? 
उत्तर : आमचा परिवार सुशिक्षित आहे. वडील सुभाष हिरे  पांटबंधारे विभागात अभियंता आहेत. मामा प्रा. जी.एम. सूर्यवंशी यांनीही यापूर्वी स्पर्धा परीक्षा दिली आहे. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन मामा, वडीलांकडून मिळाले. भाऊ महिंद्र हिरे हा देखील पुण्यात असतो. त्यानेही खूप मार्गदर्शन केले. या सर्वांच्या प्रेरणेतून हे यश मिळाले. 
प्रश्न : आगामी ध्येय कोणत? 
उत्तर : केवळ यावरच न थांबता, मला आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशनची अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. याचा उपयोग सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी करेल.
खचले नाही..
पहिल्या प्रयत्नापासून स्पर्धा परीक्षेसाठी भरपूर तयारी केली. रोज ९-१० तास अभ्यास केला. मात्र दोन प्रयत्नात अपयश आले. अपयशामुळे काहीच्या अपमानालाही सामोरे जावे लागले.मात्र मी खचले नाही. अपयशातूनच उर्जा मिळाली. जोमाने अभ्यास केला. अखेर तिसºया प्रयत्नात यश मिळाले. पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार झाले. केवळ यश मिळाले नाही तर महिला वर्गात राज्यात प्रथम येण्याचा  बहुमान मिळाला. यशात आई-वडील, नातेवाईक, शिक्षक, त्याचबरोबर पुण्यातील क्लासच्या शिक्षकांचे योगदान आहे.
मराठीतूनच शिक्षण 
अश्विनी हिरे यांचे बारावी सायन्सपर्यंत शिक्षक पिंपळनेर येथेच झाले. त्यानंतर त्यांनी  पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशन अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.
घरात आई-वडिल भाऊ-बहिण एवढाच परिवार. मात्र पालकांनी मुलगा-मुलगी असा भेद केला नाही.
स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम, भरपूर अभ्यासाची गरज आहे. नियोजनबद्ध तयारी केल्यास यश मिळते - अश्विनी  हिरे

Web Title: Failure to be held for failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे