‘फेक कॉल’मुळे अगिAशमन विभागाची तारांबळ

By admin | Published: January 15, 2017 12:43 AM2017-01-15T00:43:58+5:302017-01-15T00:43:58+5:30

धुळे : महामार्गावर गॅसच्या टँकरला आग लागल्याची घटना घडली नसून आलेला फोन हा फेक कॉल होता,

'Fake Call', a postal system of the AGM | ‘फेक कॉल’मुळे अगिAशमन विभागाची तारांबळ

‘फेक कॉल’मुळे अगिAशमन विभागाची तारांबळ

Next


धुळे : महामार्गावर गॅसच्या टँकरला आग लागल्याची घटना घडली नसून आलेला फोन हा फेक कॉल होता, अशी माहिती महापालिकेचे अगिAशमन विभागप्रमुख तुषार ढाके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ दरम्यान, या एका कॉलने अगिAशमन विभागाची मात्र मोठी तारांबळ उडाली होती़
नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील धुळे-साक्री रोडवर  असलेल्या इच्छापूर्ती गणपती मंदिरानजिक एका गॅस टँकरला आग लागल्याची घटना घडल्याची माहिती शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे, असा फोन अगिAशमन विभागाला आला. त्यामुळे विभागामार्फत तातडीने घटनास्थळी अगिAशमन बंब पाठविण्यात आला़ तेथे पोहचल्यावर चालकाने तेथे तपास केला. परंतु या ठिकाणी असा कोणताही टँकर नव्हता की त्याच्या कॅबिनला अथवा कुठे आग लागली नव्हती, असे सांगण्यात आले. या ‘फेक कॉल’मुळे मात्र अगिAशमन विभागाची चांगलीच धांदल उडाली.
 

Web Title: 'Fake Call', a postal system of the AGM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.