कदमबांडेंच्या माघारी संदर्भात अपप्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 10:33 PM2019-10-20T22:33:21+5:302019-10-20T22:56:54+5:30
सोशल मीडिया : शहर पोलिसात गुन्हा दाखल
धुळे : अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांनी उमेदवारी मागे घेतली असून त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठींबा दिला असल्याची खोटी माहिती सोशल मीडियातून प्रसारीत झाला होता. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री कदमबांडे यांचे चिरंजीव यशवर्धन कदमबांडे यांनी शहर पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, राष्ट्रवादीच्या राजवर्धन कदमबांडेंची माघार महायुतीला दिला पाठींबा या शिषर्काखाली सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली जात आहे़ महायुतीच्या उमेदवाराला पाठींबा दिल्याचे खोटे कथन करणारे वृत्त राजवर्धन कदमबांडे आणि उध्दव ठाकरे यांच्या फोटोच्या खाली नमूद करुन प्रसारीत केल्याचे लक्षात आले़ त्यामुळे यशवर्धन कदमबांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून संशयितांविरुध्द भादंवि कलम १७१ (ग), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़