कौटुंबिक न्यायालयामुळे सर्वांनाच दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:35 PM2020-07-31T22:35:19+5:302020-07-31T22:35:44+5:30
न्यायालयाचा दुसरा वर्धापन दिन : फिजिकल डिस्टन्सिंग राखत होती उपस्थिती
धुळे : कौटुंबिक न्यायालयाची स्थापना धुळ्यात झाल्याने त्याचा सर्वांनाच फायदा होत आहे़ प्रलंबित आणि कौटुंबिक कलहाची प्रकरणांचा निपटारा जलदगतीने होत असल्याचे कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश देवेंद्र उपाध्ये यांनी सांगितले़
धुळ्यात २८ जुलै २०१८ मध्ये कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात आले होते़ याच कौटुंबिक न्यायालयाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत़ त्याबद्दल झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात न्यायाधीश उपाध्ये बोलत होते़ यावेळी प्रबंधक एस़ एस़ पाराशरे, सहायक अधीक्षक शिरीष भंडारी, वरीष्ठ लिपिक बी़ एऩ बागल, कनिष्ठ लिपीक डी़ जे़ मोहीते, एम़ आय़ सूर्यवंशी, राकेश मोरे, शिपाई एस़ बी़ अहिरराव, एजाज शेख, डी़ जी़ पाटील आदी उपस्थित होते़
दोन वर्षापुर्वी लावलेले हे कुटुंबाचे बीज याच्या पुढे जावून चांगल्या मोठ्या वटवृक्षात करायचे आहे़ यासाठी सर्वांचे सहकार्य, उत्साह आणि जोमाने कार्य करण्याची क्षमता लाभो अशी सदिच्छा न्यायाधीश उपाध्ये यांनी व्यक्त केली़
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लघुलेखक एच़ ए़ रामोळे यांनी केले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक ए़ ए़ खरात यांनी केले़ दरम्यान, कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी या न्यायालयाची मदत होत आहे़