उघडय़ावर शौचास बसणा:यांचा सत्कार
By admin | Published: January 8, 2017 12:28 AM2017-01-08T00:28:34+5:302017-01-08T00:28:34+5:30
शिंदखेडा : येथील नगरपंचायतीच्या गुड मॉर्निग पथकाकडून शहरात उघडय़ावर शौचास बसणा:या 35 जणांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
शिंदखेडा : येथील नगरपंचायतीच्या गुड मॉर्निग पथकाकडून शहरात उघडय़ावर शौचास बसणा:या 35 जणांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, यापुढे उघडय़ावर शौचास बसलेला दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी तंबी मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली.
नगरपंचायतीच्या गूड मॉर्निग पथकात विवेक डांगरीकर, अशोक माळी, अबुहसन शेख, अशोक भामरे, किशोर पवार, दिलीप पाटील, मनोज पाटील, दिलीप पाटील, दिलीप पाटोळे, हुसेन मेहतर, वसीम मेहतर, सुनील राजपूत यांचा समावेश आहे. शिंदखेडा शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष शहनाजबी बागवान, उपनगराध्यक्ष दीपक देसले व मुख्याधिकारी निकत यांनी केले आहे. स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी शासनाकडून अनुदान दिलजात असतानाही अनेकांनी ते न स्वीकारता प्रात:र्विधी उघडय़ावरच करण्याचे सुरू ठेवले आहे. यापूर्वी सूचना देऊनही न ऐकल्यामुळे ही कारवाई नगरपंचायत प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. यापुढे अशा प्रकाराविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.