टिटवापाणी शिवारात गांजाची शेती उद्ध्वस्त, साडेपाच लाखांची झाडे जप्त, एकावर गुन्हा

By अतुल जोशी | Published: October 17, 2023 03:35 PM2023-10-17T15:35:48+5:302023-10-17T15:37:20+5:30

शिरपूर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

farm destroyed in titwapani shiwar plants worth five and a half lakh seized one charged with crime | टिटवापाणी शिवारात गांजाची शेती उद्ध्वस्त, साडेपाच लाखांची झाडे जप्त, एकावर गुन्हा

टिटवापाणी शिवारात गांजाची शेती उद्ध्वस्त, साडेपाच लाखांची झाडे जप्त, एकावर गुन्हा

अतुल जोशी, शिरपूर : तालुका पोलिसांनी टिटवापाणी पो. सुळे शिवारात कारवाई करून गांजाची शेती उद्ध्वस्त केली. या कारवाईत ५ लाख ७७ हजार ५०० रुपयांचे गांजाचे झाडे जप्त केले. ही कारवाई १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरपूर तालुक्यातील टिटवापाणी पो. सुळे शिवारात मदन भरतसिंग पावरा (वय ४८, रा. टिटवापाणी, पो. सुळे) याने वनजमीन क्षेत्रातील त्याच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास या शेतात पोलिसांनी छापा टाकला. त्याठिकाणी बेकायदेशीरपणे ५ ते ६ फूट उंचीची गांजाची झाडे लागल्याचे आढळून आले. पोलिस आल्याचे पाहून संशयित मदन पावरा हा फरार झाला. पोलिसांनी गांजाची शेती उद्ध्वस्त करून ५ लाख ७७ हजार ५०० रुपये किमतीची १६५ किलो गांजाची झाडे जप्त केली.

Web Title: farm destroyed in titwapani shiwar plants worth five and a half lakh seized one charged with crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.