दरखेडय़ात शेतक:याची आत्महत्या, शोककळा
By admin | Published: June 22, 2017 01:21 PM2017-06-22T13:21:13+5:302017-06-22T13:21:13+5:30
दरखेडा ता. शिंदखेडा येथिल शेतकरी दगडू आनंदा पवार (वय 67) यांनी बुधवारी आपल्या राहत्या घरी विषारी औषध घेवून आत्महत्या केली.
Next
ऑनलाईन लोकमत
शिंदखेडा,दि.22 : दरखेडा ता. शिंदखेडा येथिल शेतकरी दगडू आनंदा पवार (वय 67) यांनी बुधवारी आपल्या राहत्या घरी विषारी औषध घेवून आत्महत्या केली. दूपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना लक्षात आली़ कुटुंबियांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी धुळे येथिल खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दगडू पवार हे शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा येथे प}ीसह राहतात. स्वत:ची तीन एकर शेती वर्षानुवर्षे तोटय़ात असणारी़ यावर्षी तरी चांगला पाऊस होईल आणि चांगले पिक येईल, आणि अपेक्षित उत्पन्न येईल या आशेवर त्यांनी पुन्हा विविध कार्यकारी सोसायटीसह काही नातलगांकडून दिड ते दोन लाख रूपयावर कर्ज घेतले होत़े शेतीची मशागत करुन पेरणीही केली. लाखो रूपयांचा खर्च करून केलेली पेरणी पुन्हा पावसाअभावी वाया गेली़ दुबार पेरणी करण्याची वेळ आली. दुबार पेरणीसाठी पैसे कोठून आणायचे? आणि घेतलेले उसनवार पैसे कसे फेडायचे? या विवंचनेने पवार ग्रासले गेले आणि त्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर जावून विषारी औषध प्राशन केले.