भूसंपादनाच्या बैठकीत शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 09:45 PM2019-12-06T21:45:29+5:302019-12-06T21:46:24+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : आठ वर्षापासून मोबदल्याची प्रतिक्षा
धुळे : अक्कलपाडा योजनेच्या डाव्या कालव्यासाठी २०१२ मध्ये संपादीत करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती़ बैठकीत आंनदखेडे येथील शेतकरी सजन रूपचंद नवसारे (वय ६५) यांना हृदयविकाराचा झटका आला़ रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
२०१२ मध्ये अक्कलपाडा मध्यम प्रकल्पावरील वितरीका क्र ८ साठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागाकडून शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या होत्या़ त्यात सुट्रेपाडा येथील शेतकºयांच्याही जमिनही घेण्यात आली होती़ भूसंपादित केलेल्या शेतकरी मोबदला मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार चकरा मारत आहे़ यासंदर्भात शुक्रवारी बैठक घेण्यात आली होती़ बैठकी दरम्यान तालुक्यातील आनंदखेडे येथील शेतकरी संजन नवसारे यांना हदयविकाराचा तीव्र झटका आला़ नवसारे यांना तातडीने चक्करबर्डी येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रूग्णालयात नेण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारादरम्यान नवसारे यांचा मृत्यू झाला.
अधिकाºयाविरोधात गुन्हा
दाखल करा - आमदार
दरम्यान, भुसंपादीत जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी भूसंपादन कार्यालयात फेरा मारून देखील न्याय मिळाल्याने शेतकºयांचा मृत्यू झाला़ मृत्यूस जबाबदार असलेल्या अधिकाºयांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार फारूख शाह यांनी केली आहे़
तब्येत बिघडल्याने
मृत्यू - प्रशासन
दरम्यान, शेतकरी सजन कोळी (नवसारे) यांचा मृत्यू तब्येत झाल्याचे भुसंपादन उपजिल्हाधिकारी ुसुनिता चव्हाण यांनी कळविले आहे.