मंदाणे शिवारात विहिरीत पडून शेतक:याचा मृत्यू
By admin | Published: January 15, 2017 12:48 AM2017-01-15T00:48:12+5:302017-01-15T00:48:12+5:30
मंदाणे शिवारात इलेक्ट्रीक मोटारचा फुटव्हॉल्व्ह दुरुस्त केल्यानंतर वर चढत असताना दोर तुटल्याने विहिरीत पडून जखमी झालेल्या शेतक:याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे शिवारात इलेक्ट्रीक मोटारचा फुटव्हॉल्व्ह दुरुस्त केल्यानंतर वर चढत असताना दोर तुटल्याने विहिरीत पडून जखमी झालेल्या शेतक:याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, मंदाणे येथील शेतकरी रमेश हिरामण देवरे (55) यांचे मंदाणे शिवारात शेती आहे. 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीतील फुटव्हॉल्व्हमध्ये कचरा अडकल्याने ते दुरुस्तीसाठी विहिरीत उतरले. दुरुस्ती झाल्यानंतर वर चढत असताना दोर तुटल्याने ते विहिरीत पडून जखमी झाले. त्यात त्यांच्या पायाला जबर जखम झाली व मुका मार लागल्याने ते पुन्हा विहिरीतून वर चढू शकले नाही. देवरे हे विहिरीत उतरल्याचे आजूबाजूच्या शेतक:यांनी पाहिले होते. परंतु बराच वेळ होऊनही ते बाहेर दिसत नसल्याने त्यांनी विहिरीजवळ येऊन पाहिले असता देवरे हे जखमी अवस्थेत दिसून आले. आजूबाजूच्या शेतक:यांनी या घटनेची माहिती देवरे यांच्या कुटुंबीयांना व ग्रामस्थांना कळवून त्यांना विहिरीबाहेर काढले. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांकडे प्राथमिक उपचार करून शहादा येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले. तेथून धुळे येथे हलविण्यात आले. मात्र परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने त्यांना सुरत येथे दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. या शेतक:याच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
(वार्ताहर)