पिक कर्जाच्या विवंचनेत अंचाळेतांडा येथे शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 09:23 PM2019-11-04T21:23:01+5:302019-11-04T21:23:27+5:30
गावात व्यक्त झाली हळहळ, परिवाराची वाताहत
धुळे : परतीच्या पावसात अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले़ त्यात बँकेच्या कर्जामुळे हवालदिल झालेल्या शेतकºयाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली़ ही घटना धुळे तालुक्यातील अंचाळेतांडा गावात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे़
धुळे तालुक्यातील अंचाळेतांडा येथील नाना बाळू जाधव (४५) या शेतकºयाचे गावशिवारात शेत आहे़ या जमिनीवरच तो पत्नीसह चार मुलांचे पालनपोषण करतो़ त्याने त्याच्या शेतात यंदा कपाशी आणि बाजरीचे पीक घेतले आहे़ परतीच्या पावसात अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी साचले आहे़ परिणामी कपाशी आणि बाजरीचे नुकसान झाले आहे़ आताच्या परिस्थितीत पावसाने उघडीप दिली असलीतरी शेतात पाणी साचलेले असल्याने पीक काळे पडून कपाशीच्या बोंडाला कीड लागली आहे़ बाजरीच्या कणसांनाही कोंब फुटले असल्याने हे पीक हातचे गेलेले आहे़ नाना जाधव यांनी सेंट्रल बँकेचे पीक कर्ज आणि फायनान्स कंपनीकडूनही कर्ज घेतलेले आहे़ हजारो रुपयांचे कर्ज डोक्यावर असताना आता हाती येणारे पीकही गेल्याने गेल्या चार दिवसांपासून नाना जाधव अस्वस्थ होते़ त्यांनी घरात जणूकाही अबोला धरला होता़ दररोज सकाळी शेतात जावून दिवसभर पिकांकडे पाहत बसणे आणि रात्री घरी येऊन मुकाट्याने झोपणे असा त्यांचा दिनक्रम सुरु झाला होता़ काल सुध्दा ते याच पध्दतीने वागले असल्याचे सांगण्यात येत आहे़ पिकच हाती येणार नसल्याने कर्ज कसे फेडणार? आपले घर कसे धकवणार? असे काहीसे बडबड करीत ते झोपी गेले़ सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी जागी झाली असता पहिल्या रुममध्ये सºयाला दोर बांधून त्याचा गळफास लावून घेत लटकलेल्या स्थितीत नाना जाधव आढळून आले़ त्यांना पाहून त्यांच्या पत्नीने हंबरडा फोडला़ आवाज ऐकून आजुबाजुचे परिसरातील नागरिक धावून आले़ नाना यांना फासावरुन खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले़ डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषीत केले़ मयत नाना जाधव यांचा पुतण्या नरेंद्र अशोक जाधव यांनी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ सहायक पोलीस उपनिरीक्षक वाघ घटनेचा तपास करीत आहेत़
संपुर्ण परिवार आला उघड्यावर
नाना जाधव यांच्या पश्चात पत्नी, पदवीचे शिक्षण घेत असलेली एक मुलगी, एफवायला असलेला एक मुलगा, बारावीचे शिक्षण घेत असलेली मुलगी आणि नववीत शिक्षण घेत असलेला मुलगा असे पाच जणांचे कुटूंब आहे़ घरातील कर्ता पुरुष गेल्याने जाधव कुटुंबिय उघड्यावर आले आहे़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़