ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी शेतकरी संघटनेचे शेतातच आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 08:27 PM2020-10-02T20:27:08+5:302020-10-02T20:27:46+5:30
कापडणे : सरकारविरोधी दिल्या घोषणा, आर्थिक मोबदला देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे आज धुळे तालुक्यातील कापडणे प्रशांत यशवंत पाटील यांच्या शेतातच निषेधात्मक आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाविरोधी घोषणबाजी केली. या अनोख्या आंदोलनाची तालुक्यात चर्चा होती.
खरीप हंगामात आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तसेच सप्टेंब महिन्यातही तीन-चार वेळा वादळी पाऊस झाल्याने, कापूस, मका, भुईमूग ,ज्वारी ,बाजरी, उडीद,भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अति पावसाने शेती पिके जमीनदोस्त होऊन खराब झालेली आहेत. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतकºयांना आर्थिक मोबदला द्यावा व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीकेली. आंदोलनात पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील ,धुळे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, माजी अध्यक्ष आत्माराम बळीराम पाटील,राज्य कार्यकारिणी माजी सदस्य शांतीलाल दामोदर पटेल, जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष रवींद्र वाणी, जिल्हा संघटक नारायण हिलाल माळी, धुळे तालुका अध्यक्ष भगवान झावरू पाटील, शिंदखेडा तालुका अध्यक्ष निळकंठ पवार, आदर्श शेतकरी प्रकाश सिताराम पाटील, आदर्श शेतकरी संभाजी रघुनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य भटू विश्राम पाटील, रामकृष्ण मोरेश्वर पाटील, विश्वास आत्माराम देसले , सचिव अशोक शिवराम पाटील, मराठा सेवा संघ प्रणित धुळे जिल्हा कृषी परिषदेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, अनिल शामराव पाटील, हिलाल मुकुंदा पाटील आदी मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.