कॅशलेस सुविधेअभावी शेतकरी नाराज

By admin | Published: January 8, 2017 12:30 AM2017-01-08T00:30:17+5:302017-01-08T00:30:17+5:30

न्याहळोद : नोटाबंदीच्या दोन महिन्यांनंतरदेखील बँकेत ग्राहकांची रांग जैसे थे आहे.

Farmers angry because of cashless facility | कॅशलेस सुविधेअभावी शेतकरी नाराज

कॅशलेस सुविधेअभावी शेतकरी नाराज

Next


न्याहळोद : नोटाबंदीच्या दोन महिन्यांनंतरदेखील बँकेत ग्राहकांची रांग जैसे थे आहे. शेतक:यांनी आपल्या जवळील रक्कम बँकेत भरली. दोन महिन्यात रोज रांगेत उभे राहून शेतीसाठी खर्च केला. शेतमाल विकून फक्त लागलेला खर्च निघाला. मिळालेला पैसा धनादेश रूपात बँकेत भरला. आता पुढील पीक घेण्यासाठी पुन्हा रांगेत उभे राहण्याची वेळ शेतक:यांवर आली आहे.
शेतक:यांनी सरकारच्या आग्रहानुसार कॅशलेस व्यवहारासाठी एटीएम कार्ड काढले आहे. ते खिशात आहे. परंतु वापर कुठे करावा हा प्रश्न शेतक:यांना पडला आहे. कारण बियाणे, खते, किटकनाशके, शेतमजुरी, पेट्रोल, डिङोल अशा गोष्टी घेण्यासाठी संबंधित दुकानांवर कॅशलेस सुविधा उपलब्ध नाही. गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर देखील ही सुविधा नाही. म्हणजेच शेतमाल कृषी बाजारात घेऊन जाईर्पयत कॅशलेस व्यवहार करणे शक्य नाही किंवा तशी सुविधा नाही. मात्र माल विक्रीनंतर रोखीच्या व्यवहारात पुढील तारखेचा धनादेश शेतक:यांना दिला जात आहे. तसेच बँकेत धनादेश टाकण्यापूर्वी आम्हाला विचारुन घ्या, अशी तंबीदेखील दिली जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे शेतमाल व भाजीपाला यांचा लागलेला खर्चदेखील निघत नाही. हातात आलेला धनादेश पुन्हा बँकेत जमा करावा लागत आहे. पैशांसाठी पुन्हा बँकेच्या रांगेत उभे रहावे            लागते.
एटीएममध्ये एखाद्या दिवशी पैसे मिळतात. बँकेत एका ग्राहकाला फक्त दोन हजार रुपये दिले जात आहे.
रोज रांगेत उभे राहण्यापेक्षा आठवडय़ात एकत्र रक्कम एकाच दिवशी द्यावी, असा आग्रह ग्रामस्थांनी केला. या वेळी अनेकवेळा बँक कर्मचारी व ग्राहक यांच्यात वाद होत आहे.  नोटाबंदीने शेतकरी त्रस्त झाला आहे. दोन महिन्यानंतरदेखील बँकेतील गर्दी कमी झाली नाही. यासाठी गावात कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देणे किंवा बँकेतून जास्त रक्कम देणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी शेतात काम करणेऐवजी रोज बँकेत उभा राहिल्यास शेतीकडे दुर्लक्ष होऊन उत्पादनात घट, शेतमालाचा दर्जा खालावणे, शेतात चोरी होणे अशा अनेकप्रकारे शेतक:यांचे नुकसान होत आहे.

Web Title: Farmers angry because of cashless facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.