डोळ्यादेखत पिके वाहून गेल्याने शेतकºयाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:53 PM2019-08-10T22:53:16+5:302019-08-10T22:53:45+5:30

नवेनगर शिवारातील घटना : विष घेतल्याने रुग्णालयात उपचार

Farmers attempt suicide due to overflowing of crops | डोळ्यादेखत पिके वाहून गेल्याने शेतकºयाचा आत्महत्येचा प्रयत्न

डोळ्यादेखत पिके वाहून गेल्याने शेतकºयाचा आत्महत्येचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : पुराच्या पाण्यात बंधारे फुटल्याने उभ्या पिकांत पाणी शिरले़ दोन दिवस उलटूनही कोणी पंचनामा करण्यासाठी आले नाही की कोणी दखलही घेतली नाही़ या वैमनस्याने बाधीत झालेल्या शेतकºयाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची दुर्देवी घटना साक्री तालुक्यातील जेबापूर पैकी नवेनगर शिवारात शनिवारी सायंकाळी घडली़ आपल्या डोळ्यादेखत पिकांचे झालेले नुकसान हा शेतकरी पाहू शकला नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे़ 
साक्री तालुक्यातील जेबापूर पैकी नवेनगर शिवारात रायबा लक्ष्मण बागुल (४०) हा तरुण शेतकरी आपल्या वडिलोपार्जित शेतजमिन कसत आहे़ त्याने आपल्या शेतात सोयाबीन, वालपापडी अशी काही पिके घेतली होती़ नेहमीप्रमाणे त्याचे शेतात काम देखील सुरु होते़ याशिवाय या भागातील शेतकºयांनी देखील विविध पिके आपआपल्या शेतात लावलेली होती़ त्यांच्या शेतजमिनीजवळच पाण्याचे बंधारे आहे़ या बंधाºयामुळे सुध्दा या शेतकºयांना त्याचा फायदाच झाला आहे़ फायदा होत होता़ दैनंदिन शेतीची कामे देखील सुरु होती़
अशातच साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात पाऊस पडायला सुरुवात झाली़ पहाता-पहाता पावसाने जोर धरला़ काही वेळातच पावसाने रौद्ररुप धारण केल्याने  साक्री तालुक्यातील बहुतांश लहान-मोठी धरणे ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली़ पावसामुळे या भागातील बंधारे फुटले़ साहजिकच या बंधाºयाचे पाणी शेतात घुसण्यास सुरुवात झाली़ अल्पावधीतच बंधारेचे पाणी शेतात आल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले़ उभी असलेली पिके अक्षरश: आडवीच झाली़ तरुण शेतकरी रायबा हा हताश झाला होता़ शेतीवरच त्याचे सर्व काही अवलंबून असल्याचे समोर येत आहे़ 
बंधारा फुटल्यामुळे शेती पिकांचे झालेले नुकसान रायबा आपल्या डोळ्यादेखत पाहत होता़ हताश झाला होता़ 
या घटनेला दोन दिवस उलटले़ प्रशासनाचे कोणी अधिकारी वा कर्मचारी येतील, नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतील, पंचनामा करतील, पंचनामानंतर शासनाकडून आपल्याला काही मदत मिळेल अशी बाबडी आशा रायबा धरुन होता़ परंतु या घटनेला दोन दिवस उलटूनही कोणीही इकडे फिरकलेही नाही़ हे रायबा सहन करु शकला नाही़ आपले पुढे कसे होणार असे बहुधा त्याच्या मनात काही प्रश्नांनी घर केले असावे असा अंदाज आहे़ 
या वैमनस्यातून रायबाने आपल्या राहत्या घरी शनिवारी सायंकाळी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला़ ही बाब लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत़ 

Web Title: Farmers attempt suicide due to overflowing of crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे