बोंडअळी अनुदानापासून शेतकरी वंचीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 09:39 PM2019-01-01T21:39:10+5:302019-01-01T21:39:36+5:30
शिवसेनेतर्फे निवेदन : आठ दिवसात अनुदान खात्यावर जमा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : २०१७मध्ये बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी अनुदान जाहीर केले.मात्र धुळे तालुक्यातील ३ हजार ७४७ शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान मिळालेले नाही. हे अनुदान तत्काळ मिळावे अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी आज तहसीलदार अमोल मोरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, २०१७ मध्ये कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले होते. त्यानुसार धुळे तालुक्यातील ५० हजार ८६३ शेतकºयांसाठी ३७ कोटी ६७ लाख ८३ हजार रूपये अनुदान जाहीर झाले. यापैकी ४७ हजार ११६ शेतकºयांना अनुदान मिळाले आहे. तर ३ हजार ७४७ शेतकºयांनी तहसील कार्यालयात अनेकदा चकरा मारूनही त्यांच्या खात्यावर अद्याप अनुदान जमा झालेले नाही. प्रत्येक गावातील तलाठ्याने लाभार्थी शेतकºयांच्या अनुदान वाटपाची यादी ग्रामपंचायतीमधील बोर्डावर लावणे गरजेचे होते. मात्र ते न लावल्यामुळे अनुदान वाटपासाठी एक वर्षाचा कालावधी लागला आहे.
शेतकºयांचे अनुदान येत्या आठ दिवसात वाटप करावे. अन्यथा त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून बोंडअळीच्या अनुदानासाठी तहसील कार्यालयाला ताला ठोक आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, नितीन पाटील, देवराम माळी, लक्ष्मण पाटील, गोकूळ देवरे, कैलास पाटील, चंद्रकांत म्हस्के, जनार्दन मासुळे, भिमराव पवार, शिवदास राठोड, शरद गोसावी, नितीन देवरे, शिवाजी पाटील, दिलीप पाटील, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.