शेतकऱ्याच्या बोअरवेल आले विनापंप पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 01:33 PM2020-09-06T13:33:53+5:302020-09-06T13:34:13+5:30
गावातील १५ ते २० बोरवेल वाहताय ओसंडून
कापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे गावातील बिलाडी रोडलगत असलेले शेतकऱ्यांचे बोरवेल हे तब्बल एका महिन्याभरापासून पाच ते सात फूट उंच पाण्याने ओसंडून वाहू लागले आहेत़ यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच वेळेवर व समाधानकारक पाऊस होत असल्याने यात अधिक भर म्हणून गेल्या आॅगस्ट महिन्यात सतत पावसाची रिपरिप सुरू होती़ जिल्हाभरातील कापडणे गावासह बºयाच ठिकाणी गेल्या आॅगस्ट महिन्याभरापासून कधी मुसळधार तर कधी भीज पाऊस सातत्याने सुरू होता यामुळे जमिनीतील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वर आलेली आहे.
गावातील दोन बोरवेल जमिनीवरून आपोआप वाहत आहेत़ तर अनेक बोरवेल व विहिरींची जलपातळी जमिनीच्या अगदी चार ते पाच फुटावरती आलेली आहे. कापडणे गावातील बिलाडी रोडजवळ नितीन बाबुराव माळी, चुडामण बाबुराव माळी या शेतकºयांच्या मालकीचे वेगवेगळ्या ठिकाणी तीन बोरवेल आहेत़ पैकी यातील दोन बोरवेल पाण्याअभावी फेल झालेले होते व उर्वरित एक बोरवेल ४०० फूट खोलीवरून मात्र तब्बल एका महिन्याभरापासून कोणत्याही इलेक्ट्रिक मोटार पंप शिवाय पाच ते सात फूट उंच जमिनीच्या वरती बोरवेलचे पाणी मोठ्या प्रेशरने आपोआप बाहेर पडत आहे़ या बोरवेलचे पाणी तब्बल एका महिन्यापासून रात्रंदिवस भूपृष्ठावर ओसंडून वाहत आहे.
येथील परिसरातच लांब अंतरावर शेतकरी सुरेश दयाराम (बोरसे) पाटील, अमोल सुरेश बोरसे यांच्या शेतात देखील बोरवेल असून हा बोरवेल देखील एक ते सव्वा महिन्यापासून विना मोटार पंपाचा पाण्याचा ओसंडून वाहत आहे. मागील गेल्या तीन ते चार वर्षे मोठा कोरडा दुष्काळ होता़ भूगर्भात पाण्याविना मोठी पोकळी निर्माण झालेली होती़ सध्या सततचा नियमित मुसळधार पावसानंतर कापडणे गावातील गेल्या तीन ते चार वर्षाचा कोरडा दुष्काळ कसा धुतला गेला, हे सांगणारे ज्वलंत दृश्य समोर आले आहे़ मात्र गेल्या वर्षाच्या खरीप हंगामाच्या अखेरच्या व परतीच्या सप्टेंबर आॅक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे व यंदाच्या खरीप हंगामातील जून महिन्यापासूनच समाधानकारक पाऊस सुरू असल्याने त्यात अधिक भर म्हणून आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात सततचा कधी मुसळधार तर कधी रिपरिप स्वरूपाचा पाऊस सुरू होता़ यामुळे अतिरिक्त पाऊस होत असल्याने भूगर्भातील खडकाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपलेली असल्याने त्याचवेळी पाणी जमिनीच्या वरती येतं, जिथे जिथे पोकळी मिळेल तिथून हे पाणी भूपृष्ठावर येत आहे. कापडणे येथील नितीन माळी व सुरेश बोरसे या शेतकºयांच्या बोरवेलमध्ये प्रत्येकी ३ एचपी इलेक्ट्रिक पंप होता़ परंतु अतिरिक्त पाऊस झाल्याने कोणत्याही पंपाशिवाय यांच्या बोरवेलमधून जवळपास पाच ते सात फूट उंच पाणी भूपृष्ठावर रात्रंदिवस गेल्या महिन्याभरापासून वाहत आहे़ निसर्गाची किमया व चमत्कार पाहण्यासाठी येथे मात्र दररोज बघ्यांची गर्दी वाढत आहे. मागील चार ते पाच वर्षापासून पावसाळा अत्यंत तुरळक होत होता़ त्या तुलनेने मात्र मागील वर्षापासून पावसाळा चांगला होत आहे़ यंदाही सुरुवातीपासून समाधान कारक व वेळेवर पाऊस होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक आटलेल्या बोरवेलमधून पाणीवर येऊ लागले आहे़ विहिरीच्या जलपातळीतही मोठी वाढ होत आहे़ आता मात्र शेतकºयांचा निघणारा उत्पादित मालाला सरकारने रास्त भाव दयावा जेणेकरून शेतकरी शेती कसण्यास तग धरू शकेल. असे सुरेश दयाराम बोरसे या शेतकºयाचे म्हणणे आहे़
पावसाळा जर सप्टेंबर मध्येही असाच सलग सुरू असला तर गावातील १५ ते २० बोरवेल ओसंडून वाहत आहे़ बहुतांशी बोरवेलला अगदी तीन ते चार फुटांवरच जमिनीच्या वरती पाणी आलेले आहे़ जणू विहिरीही ओसंडून वाहतील की काय अशी परिस्थिती अतिरिक्त पावसामुळे झालेली आहे़ अतिरिक्त पावसामुळे पिकांची नासधूस होत आहे़ मात्र भूजल पातळी वाढल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे़