शेतक:यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By Admin | Published: April 14, 2017 12:35 AM2017-04-14T00:35:46+5:302017-04-14T00:35:46+5:30

कजर्मुक्ती, स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी :खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती, शेकडोंचा सहभाग

Farmers: The collector's office hit | शेतक:यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

शेतक:यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

googlenewsNext

नंदुरबार : कजर्मुक्तीसह स्वामिनाथन आयोग लागू करावा, पुष्पदंतेश्वर साखर कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात द्यावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले.
सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी नाटय़मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी यांनी केले. रणरणत्या उन्हात निघालेल्या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर तेथे सभेत रूपांतर झाले. या वेळी खासदार शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. कजर्मुक्ती झालीच पाहिजे, असा ठाम निर्धार करीत स्वामिनाथन आयोग शेतक:यांच्या हिताचा कसा आहे हे स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
या वेळी जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षापासून अनियमित पजर्न्यमान, शेतमालाला मिळणारा कमी भाव, महागडे बियाणे, खते, मजुरीचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे शेतकरी कजर्बाजारी होत चालला आहे. बँकांसह खासगी सावकारांचेही कर्ज त्याच्यावर थकीत आहे. त्यामुळे कर्जाच्या बोजाखाली शेतकरी आहे. आता कजर्माफी मिळाली नाही तर शेतक:यांचे        जिणे कठीण होऊन बसेल.        त्यामुळे लवकरात लवकर कजर्माफी करून शेतक:यांचा सातबारा कोरा करावा.
जिल्ह्यात शेतमालाच्या किरकोळ चो:या सुरुवातीपासूनच सुरू आहेत, परंतु गेल्या पाच-सहा वर्षात एक विघातक वृत्ती पसरत चालली आहे. उभी पिके कापून फेकणे, टय़ूबवेल, विहीरमधील केबल कापून फेकणे, पाईप चोरणे अशा घटना घडत आहेत, परिणामी शेतकरी हैराण झाला आहे. या विघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत. परिसरातील शेतक:यांना संरक्षण देण्यासाठी पोलिसांना कडक निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना तत्कालीन सत्ताधा:यांनी शेतकरी, सभासदांच्या संमतीशिवाय खासगी कंपनीला विकला. कारखाना पुन्हा शेतकरी-सभासदांच्या ताब्यात मिळावा,  कारखान्याचा लिलाव ज्यावेळी करण्यात आला तेव्हा त्या कारखान्याच्या सभासदांचा किंवा कारखान्याचे इतर शासकीय बँक व शासकीय देणे किंवा कर्मचा:यांचाही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे सर्व संबंधित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कारखाना सभासदांच्या ताब्यात द्यावा, अशीही मागणी यात करण्यात आली आहे.
याशिवाय जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीला   पाणी मिळावे, शेतीसाठी 24 तास  वीज मिळावी, शेतक:यांना    घटनेनुसार संरक्षण मिळावे आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या वेळी मुकुंद प्रल्हाद चौधरी, नथ्थू पाटील, कृष्णदास सखाराम पाटील, वसंत पाटील, प्रवीण    पाटील, मोहन पटेल, गोरख       पाटील, पोपटभाई पाटील, विलास कोकणी, विनायक पाटील, रमेश पाटील, अॅड. प्रमोद पाटील, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.   
काँग्रेस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षही सहभागी..

काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांची शेतकरी संघर्ष यात्रा रविवार, 16 एप्रिल रोजी नंदुरबारात येत आहे. त्याची तयारी सुरू आहे. आजच्या मोर्चातदेखील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर सहभागी असल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनीदेखील काही वेळ मोर्चात सहभाग घेतला.
रणरणत्या उन्हात अर्थात 41 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात निघालेला मोर्चा लक्षवेधी ठरला. छत्रपती शिवाजी नाटय़मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय हे अंतर तीन ते साडेतीन किलोमीटर आहे. एवढय़ा उन्हात आणि एवढे अंतर चालत गेल्यानंतरही शेतक:यांचा उत्साह कायम होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यावर तेथे मिळेल त्या झाडाच्या सावलीखाली शेतकरी बसले होते. खासदार राजू शेट्टी व पदाधिकारीदेखील एका झाडाच्या सावलीचा आसरा घेत बसले. मोर्चादरम्यान शेतक:यांना पाणी पाऊच वाटप करण्यात आले.

Web Title: Farmers: The collector's office hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.