धुळे जिल्ह्यात चलन तुटवडय़ाचा शेतक:यांना फटका

By admin | Published: May 31, 2017 05:38 PM2017-05-31T17:38:50+5:302017-05-31T17:38:50+5:30

कर्ज पुरवठा करताना शिकस्त करावी लागत असल्याची माहिती बॅँकेच्या सूत्रांनी दिली

Farmers of currency breakdown in Dhule district: | धुळे जिल्ह्यात चलन तुटवडय़ाचा शेतक:यांना फटका

धुळे जिल्ह्यात चलन तुटवडय़ाचा शेतक:यांना फटका

Next

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 31 - धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतर्फे आतार्पयत 28 टक्के कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या एक-दीड महिन्यापासून भेडसावणारा चलन तुटवडय़ाचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे कर्ज पुरवठा करताना शिकस्त करावी लागत असल्याची माहिती बॅँकेच्या सूत्रांनी दिली.
जिल्हा बॅँकेने धुळे जिल्ह्यात 9 हजार 937 शेतकरी सभासदांना 47 कोटी 97 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात 3 हजार 97 शेतकरी सभासदांना 20 कोटी 81 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. दोन्ही जिल्ह्यांत मिळून आतार्पयत 13 हजार 34 सभासदांना एकूण 68 कोटी 78 लाख रुपये पीक कर्जापोटी वितरित करण्यात आले आहेत.
दीड महिन्यांपासून जाणवणारा चलनाचा तुटवडा पीक कर्ज वितरित करताना मोठा अडचणीचा ठरत आहे. पावसाळा तोंडावर आल्याने शेतकरी सभासदांकडून पीक कर्जाची मागणी होत आहे. परंतु सरकारकडून पुरेशी मदत होत नसल्याने बॅँक आपल्या पातळीवर अन्य स्त्रोतांद्वारे पैसे उपलब्ध करून पीक कर्ज शेतक:यांना देत आहेत. मोठय़ा शिकस्तीने कर्ज वाटप केले जात असल्याने अद्याप कर्जासाठी शेतक:यांना ताटकळत ठेवण्याची वेळ आलेली नाही. परंतु पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने शेतकरी कर्जासाठी गर्दी करत आहेत. आतार्पयत जिल्हा बॅँकेने आपल्या उद्दिष्टाच्या तुलनेत 28 टक्के पीक कर्ज वाटप केलेले आहे.
कर्जमाफीच्या अपेक्षेमुळे परतफेडीवर परिणाम
दरवर्षी मार्च, एप्रिलर्पयत सरासरी 35 ते 40 टक्के पीक कर्जाची वसुली होते. एप्रिलपासून नवे कर्ज वाटप होत असल्याने ते मिळविण्यासाठी शेतकरी पूर्वीच्या कर्जाची परतफेड करतात.
मात्र यंदा मार्चअखेर आर्थिक वर्ष संपल्यानंतरही एप्रिल, मे महिन्यात शेतकरी पूर्वीच्या पीक कर्जाची परतफेड करण्यात स्वारस्य दाखविलेले नाही. कारण सध्या कृषी कर्जमाफीची मोठी आशा शेतकरी बाळगून आहेत. मात्र त्यांनी जून महिन्यात जरी जुन्या कर्जाची परतफेड  केली तरी ते नव्या कर्जासाठी पात्र ठरणार आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात गतवर्षी 31 हजार 889 सभासदांना 115 कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते. यंदा पीक कर्जाचे उद्दिष्ट 10 कोटींनी वाढवून दिले असून 125 कोटींवर गेले आहे. परंतु चलन तुटवडा कायम असल्याने हे आव्हान पेलताना कसरत करावी लागत आहे. सरकारने मदतीचा हात दिल्यास कर्ज वितरित करणे सोपे होणार असल्याचेही सूत्र म्हणाले.
जुन्या नोटा नाहीत
नोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅँकांकडे आलेल्या जुन्या नोटा अद्याप बदलून मिळालेल्या नाही. त्यामुळे या नोटा राज्यातील काही जिल्हा बॅँकांकडे पडून आहेत. परंतु धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेकडे जुन्या नोटा नाहीत. कारण नोटाबंदीनंतर बॅँकेकडे जुन्या नोटांच्या स्वरुपात जमा झालेले 37 कोटी रुपयांचा बॅँकेने वेळीच भरणा केला होता.

Web Title: Farmers of currency breakdown in Dhule district:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.