सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी - अनिल घनवट
By admin | Published: January 14, 2017 12:16 AM2017-01-14T00:16:42+5:302017-01-14T00:16:42+5:30
शेतकरी संघटनेच्या पिंपळनेर शाखेतर्फे बैठक; शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी करणार प्रय}
पिंपळनेर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी शरद जोशी यांनी सूचविलेल्या ‘कृषी टास्क’ फोर्सच्या शिफारशी लागू करण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून शरद जोशी यांच्या कृषी टास्क या योजनेविषयी जनजागृती करून त्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल जयसिंग घनवट यांनी येथे दिली.
येथील मराठा मंगल कार्यालयात शेतकरी संघटनेच्या पिंपळनेर शाखेतर्फे शेतक:यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे, धुळे जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, गुलाबसिंग रघुवंशी, तालुकाध्यक्ष रामकृष्ण बोबले, भटू अकलाडे, आत्माराम देसले, सत्तारसिंग उपस्थित होते. यशस्वितेसाठी शांतूभाई पटेल, पोपटराव कुवर, जगन्नाथ राजपूत, भास्करराव काकुस्ते, शांताराम गांगुर्डे, आत्माराम देसले, निंबा जाधव, रमाकांत गांगुर्डे जगदीश नेरकर, धनराज पाटील, चंदू कोठावदे, दत्तात्रय बेडसे यांनी परिश्रम घेतले.
शेतीमालाचे भाव पाडण्याचा कार्यक्रम
अनिल घनवट म्हणाले, की शेतक:यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसून या सरकारने शेतीमालाचे भाव पाडण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामुळे राज्यात शरद जोशी यांच्या ‘कृषी टास्क फोर्सच्या’ शिफारशी लागू करणे गरजेचे आहे. परंतु, तसे होत नसल्याची खंत घनवट यांनी व्यक्त केली.
डाळ, हरभरा, गहू, तेलाची आयात व साखर उद्योगावर अनेक र्निबध लादले आहेत. त्यात इथेनॉलच्या किमती कमी केल्यामुळे साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. ‘मेक इन इंडिया’चा आग्रह धरणा:या सरकारला शेतक:यांच्या प्रश्नाविषयी गांभीर्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
शशिकांत भदाणे यांची निवड
बैठकीत अनिल धनवट यांनी शशिकांत भदाणे (पिंपळनेर) यांची शेतकरी संघटनेची तळमळ पाहता उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे उपाध्यक्षपदी निवड केली.
तसेच यावेळी शेतकरी संघटनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी गुलाबसिंग बाजीराव रघुवंशी, जिल्हा शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीपदी चित्राबाई निंबा जाधव (रा. छाईल, ता. साक्री) यांची निवड करण्यात आली.
नोटाबंदीचा शेतक:यांना फटका
नोटाबंदीमुळे देशातील शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात सरकारने पीक कर्जावर दोन महिन्याच्या व्याजावर सूट देऊन जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतक:यांनी वीज बिले माफ करा, कर्जमुक्त करा, शेतीविरोधी कायदे रद्द करावेत, असे घनवट यांनी सांगितले. यावेळी ए. के. पाटील यांनी शेतक:यांच्या समस्यासंदर्भात माहिती दिली.