धुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी शेततळ्यांकडे फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:44 AM2017-12-21T11:44:06+5:302017-12-21T11:45:22+5:30
५०० पैकी फक्त ६२ शेततळे पूर्ण, कृषी विभागाने प्रोत्साहन देण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्ह्यात ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले होते. असे असले तरी नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ६२ शेततळ्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. शेततळ्यांच्या कामांची टक्केवारी अवघी ८ टक्के आहे. एक प्रकारे शेततळ्यांकडे शेतकºयांनीच पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान] शेततळ्यांसाठी शेतकºयांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे.
शासनामार्फत राबविण्यात येणाºया ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत २०१६-१७ व १७-१८ नुसार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यासाठी १२५ प्रमाणे ५०० शेततळ्यांचे नियोजन कृषी विभाागतर्फे करण्यात आलेले होते. त्यानुषंगाने गत नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामासाठी ६२० शेतकºयांचे ‘आॅनलाइन’ अर्ज प्राप्त झाले. यापैकी १६७ शेतकºयांना शेततळ्यांसाठी कार्यारंभाचे आदेश देण्यात आले. आतापर्यंत फक्त ६२ शेततळे पूर्ण झालेले आहेत. शेततळ्यांची ही टक्केवारी अवघी आठ आहे.
सर्वाधिक शेततळी
साक्री तालुक्यात
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला १२५ शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार सर्वाधिक शेततळी साक्री तालुक्यात (५२) झाली. साक्री तालुक्याच्या आसपास एकही तालुका नाही. धुळे तालुक्यात केवळ सहा, शिंदखेडा तालुक्यात तीन, तर शिरपूर तालुक्यात अवघे एक शेततळे झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद केलेले आहे.
आकारमानानुसार निधी
शेततळ्यांचे आकारमानही निश्चित करण्यात आले. त्यानुसार सर्वात लहान १५ बाय १५ बाय ३ मीटर व सर्वात मोठे ३० बाय ३० बाय ३ मीटर आकाराचे हे शेततळे करावयाचे आहे. यासाठी पूर्वी राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत ८२ हजार रुपये अनुदान मिळायचे. तर आता यासाठी ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत असते.
प्रोत्साहित करण्याची गरज
जिल्ह्यात यावर्षी शेततळ्यांची संख्या नगण्यच आहेत. त्यामुळे शेततळे निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना कृषी विभागामार्फत प्रोत्साहित करण्याची गरज आहे.