धुळे जिल्ह्यातील शेतकºयांचा यावर्षीही कापूस लागवडीकडेच कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:44 AM2018-05-12T11:44:47+5:302018-05-12T11:44:47+5:30

खरीप हंगाम : जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट

Farmers of Dhule district this year too will be the only farmers to cultivate cotton | धुळे जिल्ह्यातील शेतकºयांचा यावर्षीही कापूस लागवडीकडेच कल

धुळे जिल्ह्यातील शेतकºयांचा यावर्षीही कापूस लागवडीकडेच कल

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात खरीपासाठी तयारी सुरूकृषी विभागाने पेरणीचे क्षेत्र केले प्रस्तावितमका, तूर, भुईमुगाचे क्षेत्र वाढणार

आॅनलाइन लोकमत
धुळे : यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने लागवडीचे क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ४ लाख ४० हजार ६०० हेक्टरवर खरीपाची पेरणी प्रस्तावित केलेली आहे. गेल्यावर्षी बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान झालेले असले तरी, गेल्यावर्षाप्रमाणेच यावर्षीही २ लाख  पाच हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. यावर्षी मका, तूर, भुईमुग, ऊसाच्या क्षेत्रामध्ये थोडी वाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
धुळे जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्रे ३ लाख ७६ हजार हेक्टर इतके असून, २०१७-१८  मध्ये कृषी विभागाने एवढ्याच क्षेत्रावर लक्षांक निश्चित केले होते. प्रत्यक्षात खरीप हंगामात जल्ह्यात ४.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आल होती. ही लागवड सरासरीच्या तुलनेत ११६ टक्के एवढी होती.
मागीलवर्षी झालेल्या अनियमित पावसामुळे मुग,उडीद यासारखी अल्पावधीच्या कालावधीच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले होते.  त्यामुळे शेतकºयांची सर्व मदार कपाशीवर होती. मात्र आॅक्टोंबर महिन्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कपाशीचे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले.
कपाशी लागवडीकडेच कल : गेल्यावर्षी कपाशीत शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असला तरी, यावर्षीही शेतकºयांचा कल कापूस लागवडीकडेच सर्वाधिक आहे. गेल्यावर्षी २ लाख ५ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली होती. तेवढीच २०१८-१९ या खरीपाच्या हंगामात होणार आहे.
मका, तुर, भूईमुग क्षेत्रात वाढ: गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मका, तुर, भुईमुगाच्या क्षेत्रात वाढ प्रस्तावित आहे. गेल्यावर्षी मुगाची ६३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित होती. यावर्षी ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी प्रस्तावित असून, गेल्यावर्षाच्या तुलनेत २५०० हेक्टरने जास्त आहे. २०१७-१८ मध्ये तुरीची ६८०० हेक्टर व भुईमुगाची १२ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित होती. २०१८-१९ मध्ये  या दोन्ही पिकांची ७७०० व १४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. दोन्ही पिकांत अनुक्रमे ९०० व १४०० हेक्टर क्षेत्र जास्त आहे. गेल्यावर्षी उसाची ११०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित होती. यावर्षी १५०० हेक्टरवर पेरणी होणे अपेक्षित असून, ती ४०० हेक्टर जास्त आहे.


 

Web Title: Farmers of Dhule district this year too will be the only farmers to cultivate cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.