शेतकऱ्यांचा बाजार समितीत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 01:22 PM2020-07-18T13:22:51+5:302020-07-18T13:23:10+5:30

शिरपूर कृषी बाजार समिती : तब्बल आठ दिवसापासून नंबर लावून ट्रॅक्टर उभे असतांना मका मोजण्यास मनाई

Farmers sit in the market committee | शेतकऱ्यांचा बाजार समितीत ठिय्या

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शिरपूर तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते़ मात्र तब्बल आठ दिवसापासून भरड धान्य विक्रीसाठी रांगेत शेतकऱ्यांनी वाहने लावलेली असतांना देखील १५ जुलैपासून अचानक खरेदी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकºयांनी शुक्रवारपासून त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे़ जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत त्याचठिकाणी थांबणार असल्याचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले़
मार्केट आवारातील खरेदी-विक्री संघाच्यावतीने भरड धान्य खरेदी केली जात होती़ मात्र शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक असतांना हजारावर शेतकºयांनी केली, परंतु काही शेतकºयांनी न करता प्रत्यक्ष मोजमाफ केंद्रावर येवून त्यांच्याकडून संबंधित संघाच्या कर्मचाºयाने शेतकºयांचे ७/१२ उतारा गोळा करून प्रत्येकाकडून काही रक्कम घेवून आॅनलाईन नोंदणी करण्यात येईल असे शेतकºयांना सांगण्यात आले होते़ त्यामुळे शेतकºयांनी संबंधित कर्मचाºयावर भरवसा ठेवून ७/१२ उतारा दिला होता़ मात्र त्या कर्मचाºयाने वशिलेबाजी करीत बºयाच शेतकºयांची मोजणी केली़ दरम्यान, मोजणी धिम्यागतीने सुरू होती़
कोरोनाचा लॉकडाऊन व जनता कर्फ्युमुळे शेतकºयांना ज्यावेळी खरेदीचा नंबर लागेल त्या आदल्या दिवशी एस़एम़एस़ करून कळविले जात होते़ परंतु त्याचा फायदा घेत संघाच्या कर्मचाºयाने अर्थपूर्ण व्यवहार व वशिलेबाजी करून बºयाच शेतकºयांचा माल खरेदी केला़
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकरी मोजमाफ केंद्रावर वाहनांसह उभे राहून सुध्दा त्यांचा आजही नंबर लागलेला नाही़ तशातच १५ जुलैपासून खरेदी बंद करण्यात आल्याचे सांगून सदरचे वाहने घरी घेवून जाण्याचे सांगण्यात आले़ मात्र शेतकºयांनी मोजमाफ ठिकाणी असलेल्या ३० वाहनांची मोजणी होईल या अपेक्षेने ठाण मांडून बसले आहेत़
१७ रोजी या संदर्भातले निवेदन शेतकºयांनी तहसिलदाराना दिले़ त्यात शेतकºयांनी फेडरेशनमध्ये नोंदणी केलेली असतांना मोबाईलवर मॅसेज येवून माल विक्रीस करण्यासाठी मार्केटला आणावा असे कळविण्यात आले़
त्यामुळे शेतकºयांनी ६ जुलै रोजी भाड्याचे वाहने करून मका विक्री करण्यासाठी मार्केट आवारात आणला़ त्यानंतर आठवडा उलटूनही माल खरेदी होत नसल्यामुळे संबंधित कर्मचाºयांना भेटल्यावर ते उडवाउडवीचे उत्तरे देत होते़ दररोज शेतकरी त्या कर्मचाºयांना भेट होते़ ८ ते १० दिवस होवूनही मका खरेदी करण्यात आलेला नाही़
विशेषत: गरजु शेतकºयांनी जेवण सुध्दा तेथेच करीत आहेत़ सध्या पावसाळ्याचे दिवस असतांना शेतीचे अनेक कामे सुरू असतांना ते सोडून या ठिकाणी थांबावे लागत असल्यामुळे तेथे देखील नुकसान सहन करावे लागत आहे़
प्रशासनाने नियमानुसार मका खरेदी करावा तसेच संबंधितांचा हलगर्जीपणामुळे इतर होत असलेला खर्चही देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे़
ठिय्या आंदोलन सुरुच
शुक्रवारी तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतरही सायंकाळपर्यंत यासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नव्हता. त्यामुळे शेतकºयांनी आपले ठिय्या आंदोलन शुक्रवारी सायंकाळीही सुरु ठेवले होते. तसेच जोपर्यंत आमचा मका खरेदी केला जात नाही. तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार शेतकºयांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Farmers sit in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.