फाशीपूल ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे कामे प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 06:52 PM2019-06-27T18:52:07+5:302019-06-27T18:52:24+5:30
महापालिका : दहा कोंटीच्या कामातुन भूमिगत गटांरीसह विविध विकाम कामे साकारणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :शहरातील महत्वाच्या स्टेशनरोड निर्मितीसाठी १० कोटी रुपयांचा निधी राज्यशासनाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत फाशीपूल ते दसेरा मैदानपर्यत रस्त्याचे कामे प्रगतीपथावर आहे़
जुने धुळे भागात भूमिगत गटारी, वॉल कंपाऊंड अंतर्गत रस्ते कामांसाठी ३ कोटी ४४ लाख असा एकूण १३ कोटी ४४ लाखांचा निधी मंजूर झाला होता. १३ कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाकडून वितरित झाला होता़ आचार सहितेनंतर या कामांना सुरूवात झाली आहे़ या रस्त्यामुळे वाहतुकीची समस्या सुटून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे़ रेल्वे स्टेशन समोरील प्रमुख रस्ता न्यायालयाच्या आदेशाने अतिक्रमण काढल्यानंतर बरेच दिवस हा या रस्त्याचे काम ठप्प होते़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दसेरा मैदान ते संतोषी माता चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण आणि सुशोभीकरणाचे काम १० कोटी रुपयांतून केले जात आहे.
01नगरविकास विभागाकडून ११ फेब्रुवारीलर याबाबतचे लेखी आदेश जारी केले आहेत.
02१० कोटी रुपयांचा निधीतून स्टेशन रोडचे विस्तारीकरण, डांबरी करण आणि सुशोभीकरणाचे होत आहे़
03फाशीपूल ते दसेरा मैदानपर्यत होणाºया रस्त्यामुळे शहराच्या सौदर्यांत भर पडून वाहतूकीची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे़