Dhule Municipal Election 2018 : ३५५ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 06:19 PM2018-12-08T18:19:26+5:302018-12-09T12:45:26+5:30
धुळे महापालिका निवडणूक : २ हजार २५० कर्मचारी केंद्रांवर रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मनपा निवडणुकीच्या ७४ जागांसाठी ३५५ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद होणार आहे. रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मतदान होणार असून त्यासाठी मनपा व पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
कर्मचाºयांना मतदान साहित्य वाटप
रविवारी ४६९ मतदान केंद्रांमध्ये मतदानसाठीची व्यवस्था करण्यात आली. मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या २ हजार २५० कर्मचाºयांना मंगळवारी सकाळी ९ ते ३ वाजेदरम्यान नगाव बारीजवळील शासकीय गोदामामध्ये मतदान यंत्राची प्राथमिक तपासणी केल्यानंतर मतदान साहित्याचे वाटप करून मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. सकाळी ७ वाजेपासून कर्मचारी हजरमतदान साहित्य घेण्यासाठी सर्व कर्मचाºयांना सकाळी ७ वाजेपासून बोलाविण्यात आले होते. तसेच सर्व कर्मचाºयांना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची तपासणी मनपा अधिकाºयांनी करून घेतली. त्यानंतरच कर्मचाºयांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सहा निवडणूक कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कापडणीस, विक्रम बांदल, शरद पवार, संजय गायकवाड, गणेश मिसाळ, रामसिंग सुलाने यांनी सर्व साहित्य वाटपाचा आढावा घेत, प्रत्यक्ष पाहणी देखील केली.
तीन टप्प्यात साहित्याचे वाटप
सर्व कर्मचाºयांना सकाळी ९ ते ११, ११ ते १२ व दुपारी १ ते ३ अशा तीन टप्प्यात साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर एसटी महामंडळाच्या ४० बसेसद्वारे मतदान केंद्रावर सर्व कर्मचाºयांची रवानगी करण्यात आली. मतदानाच्या दिवशी अधिकारी व कर्मचाºयांसाठी शासकीय व खासगी अशा १३२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून, आचारसंहिता कक्षाच्या पथकासह ६ पथके रविवारी दिवसभर शहरातील प्रत्येक भागात पाहणी करणार आहे.
अशी करण्यात आली आहे कर्मचाºयांची नियुक्ती
४५० मतदान केंद्रासाठी २ हजार २५० कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व मतदान केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई, तर मुस्लीम बहुल भागातील केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ महीला अधिकारी व शिपाई यांचा समावेश आहे. त्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी १ पुरुष व १ महिला पोलीस नियुक्त करण्यात आला आहे.
उमेदवारांच्या माहितीचे फलकही मतदान केंद्रांवर लावणार
यंदा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभागांमध्ये जे उमेदवार उभे आहेत. अशा सर्व उमेदवारांची संपत्ती, शिक्षण व गुन्हेगारी पार्श्वभूमी या बाबतच्या माहितीचे फलक मतदान केंद्रावर लावण्यात आले आहेत. मतदारांना उमेदवारांची माहिती होण्यासाठी हे फलक लावल्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.