दुर्लक्षित रस्त्याचे अखेर भाग्य उजाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:40 AM2021-05-25T04:40:03+5:302021-05-25T04:40:03+5:30

यावेळी सोसायटीचे चेअरमन नाना चौधरी, व्हा चेअरमन दिलीप भामरे, राजेंद्र देसले, धर्मराज निकम, रमेश भामरे, दत्तात्रय देसले, रमेश मराठे, ...

The fate of the neglected road will finally dawn | दुर्लक्षित रस्त्याचे अखेर भाग्य उजाळणार

दुर्लक्षित रस्त्याचे अखेर भाग्य उजाळणार

Next

यावेळी सोसायटीचे चेअरमन नाना चौधरी, व्हा चेअरमन दिलीप भामरे, राजेंद्र देसले, धर्मराज निकम, रमेश भामरे, दत्तात्रय देसले, रमेश मराठे, कैलास तलवारे, नंदू शिंपी, राकेश पाटील, संतोष ठाकूर, श्याम पवार, योगेश देसले, राजू पाटील, बबलू बडगुजर महेंद्र मराठे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

शिंदखेडा शिवारातील शिंदखेडा ते विरदेल शहरापासून २ किमी अंतरावर जुना खोपडी रस्ता आहे. या रस्त्यावर आजपर्यंत साधा मुरूमदेखील टाकण्यात आलेला नव्हता. शिंदखेडा शहरातील शेतकऱ्यांच्या या शिवारात जमिनी आहेत. या रस्त्यावर काळी माती असल्याने पावसाळ्यात चिखल होतो. अरुंद रस्ता आणि चिखल यामुळे पायी चालणेदेखील अवघड होते. शेतकऱ्यांची बैलगाडी जाणे अशक्य होते. अनेक वेळेस बैलगाडी या रस्त्यावर दोन-दोन दिवस चिखलात अडकूनदेखील राहिल्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नेहमीच्या या समस्येला शेतकरी त्रस्त झाला होता. अनेकदा तक्रारी करूनदेखील या समस्येकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष केले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पीक सरंक्षण सोसायटीने दीड किमी रस्त्यासाठी दीड लाख लोकवर्गणी गोळा करून प्रत्यक्ष रस्ता कामाला सुरुवातदेखील केली आहे. आठ दिवसात रस्त्यावर खडी, मुरूम टाकून काम पूर्ण होईल, असे सोसायटीचे चेअरमन नाना चौधरी यांनी सांगितले. या अगोदरदेखील अश्याचप्रमाणे जुना अमळथे रस्तादेखील लोकवर्गणीतून बनवला आहे. सोसायटीचा या कामांमुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: The fate of the neglected road will finally dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.