ऐन दिवाळीत FDA ची कारवाई, ३४ लाख ५० हजारांचा मावा अन् पामोलीन तेल जप्त

By अजित मांडके | Published: October 25, 2022 03:40 PM2022-10-25T15:40:38+5:302022-10-25T15:42:50+5:30

दिवाळीच्या सणात प्रामुख्याने उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थाचा गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे

FDA action on Diwali, Mawa and palm oil worth 34 lakh 50 thousand seized in bhiwandi | ऐन दिवाळीत FDA ची कारवाई, ३४ लाख ५० हजारांचा मावा अन् पामोलीन तेल जप्त

ऐन दिवाळीत FDA ची कारवाई, ३४ लाख ५० हजारांचा मावा अन् पामोलीन तेल जप्त

Next

ठाणे : ठाणे अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकदा कल्याण आणि भिवंडीत कारवाई करण्यात आलेली आहे. कल्याण येथून दोन ट्रक मधून आणलेला २७ लाख ६८ हजार ९०० रुपये किंमतीचा मावा आणि भिवंडीतून सहा लाख ८१ हजार ९१८ रुपये किंमतीचा पामोलीन तेलाचा साठा असा एकूण ३४ लाख ५० हजार ८१८ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला  आहे. 

दिवाळीच्या सणात प्रामुख्याने उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थाचा गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यातच सणासुदीच्या काळात मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने मात्र त्या प्रमाणात खव्याची उपलब्धता होत नसल्याने मागणी आणि पुरवठा यात समन्वय साधण्यासाठी व्यापाऱ्याकडून स्वीट, हलवा, बर्फी या नावाने खवा सदृश्य अन्नपदार्थाचे वितरण होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्या अनुषंगाने  २४ ऑक्टोबर २०२२ रोजी कल्याण, काळा तलाव येथील "भवानी लॉन्स, येथे आलेल्या ट्रकमधून १७ लाख १९ हजार ३०० किमतीचा ४ हजार ४८७ किलो वजनाचा तर दुसऱ्या ट्रक मधून १० लाख ४९ हजार ६०० रुपये किंमतीचा ५ हजार २४८ किलो मावा किंवा मावा सदृश्य अन्नपदार्थ साठा जप्त केला. याचदरम्यान  भिवंडी,फुलेनगर येथील मेसर्स शेफ शुभ कुकिंग ऑइल, पाटील कंपाऊंड येथून ६ हजार ८१ हजार ९१८ रुपये किंमतीचा ६ हजार ६६७  किलो रिफाइंड पामोलीन तेल साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत कोकण विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी रामलिंग बोडके, माणिक जाधव, राजेंद्र कर्डक, भालचंद्र कुलकर्णी,  वानरे तसेच कीर्ती देशमुख यांनी केली.
 

Web Title: FDA action on Diwali, Mawa and palm oil worth 34 lakh 50 thousand seized in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.