अटकेची भीती, चोरट्याची आत्महत्या

By admin | Published: February 12, 2017 12:58 AM2017-02-12T00:58:24+5:302017-02-12T00:58:24+5:30

तीन जणांच्या टोळीला साक्री पोलिसांनी शुक्रवारी रात्री पकडले. यापैकी एक जण पळून गेला. पकडले जाण्याच्या भितीने त्याने सटाणा गावानजीक एका पुलाखाली गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

Fear of arrest, thievery suicide | अटकेची भीती, चोरट्याची आत्महत्या

अटकेची भीती, चोरट्याची आत्महत्या

Next

साक्री : शहरातील एका  दुकानात शुक्रवारी रात्री चोरी करणाºया तीन जणांच्या टोळीला साक्री पोलिसांनी शुक्रवारी रात्री पकडले.  यापैकी एक जण पळून गेला.   पकडले जाण्याच्या भितीने त्याने सटाणा गावानजीक एका पुलाखाली गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
शुक्रवारी मध्यरात्री  डी. आर. पाटील बॅँकेजवळील एका इलेक्ट्रीकल्स  दुकानाच्या छताचा पत्रा उचकवून  तीन चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. दुकानातून त्यांनी ३५० रुपये चोरले. त्यानंतर ते बाहेर आले असता, त्यांच्या संशयित हालचाली पाहून एका गुरख्याने पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक अतुल तांबे त्वरीत घटनास्थळी पोहचले.  पोलिसांना बघून ते तिन्ही चोरटे पळाले.  पोलिसांनी त्यांचा मागोवा काढत गढी भिलाटीतून गणेश शिंदे (२०) व दुसरा अल्पवयीन आरोपी (रा. साक्री) याला  ताब्यात घेतले.  यावेळी या ठिकाणाहून अविनाश पवार हा तिसरा चोर पळून गेला. त्याने एकाची मोटारसायकल चोरून नेली. त्यानंतर अविनाशने सटाणानजीक एका पुलाखाली आत्महत्या केली.
 राजेंद्र भगवानदास काबरा याच्या फिर्यादीवरून  तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

Web Title: Fear of arrest, thievery suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.