दुरूस्तीअभावी बुरूज ढासळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 12:17 PM2020-10-07T12:17:55+5:302020-10-07T12:19:55+5:30

वडजाई : १४व्या वित्त आयोगाचा निधी येऊनही दुरूस्तीचे काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

Fear of tower collapse due to lack of repairs | दुरूस्तीअभावी बुरूज ढासळण्याची भीती

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वडजाई :येथील किल्लारुपी गाव दरवाजाच्या बुरुजाची डागडुजी (दुरुस्ती) न केल्यास बुरुज ढासळतील अशी भीती व्यक्त होत आहे. गेल्या वर्षाचा १४ व्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध असताना काम होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
वडजाई गावाची शान म्हणून ओळखला जाणारा किल्लारूपी बुरुज असलेला गाव दरवाजा गावाची ओळख बनला आहे. दोघे बाजुला दगडी बाधकाम करुन मोठे बुरुज बाधण्यात आले आहेत. त्या बुरुजावर जुनी ग्रामपंचायतीचे कार्यालय होते. सध्या ही जागा तलाठी कार्यालयासाठी दिलेली आहे. १९९० साली सरपंच म्हणुन रामदास दत्तु सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात पाहिले त्यांनी गावदरवाजा साठी निधी उपलब्ध केला . गाव दरबाजाला साईडने बुरुज बनवुन त्याला किल्लासारखे स्वरूप दिले. दोन्ही बुरुजाच्यावर मध्यभागी ग्रामपचायतीचे कार्यालय बांधले. कार्यालयापुढे शिवाजी महाराजाचा पुतळा बसविण्यासाठी कमान तयार केली. तत्कालीन कामगारमंत्री शाबीर शेख यांच्या हस्ते या गाव दरवाजावर शिवाजी महाराजाचा पुतळा बसविला नविन ग्रामपंचायतीचे उद्घाटन केले होते. या गोष्टला वीस वर्ष होत असताना गाव दरवाजा बुरुजचे दगडी काम काही ठिकाणी ढासाळायला सुरुवात झाली आहे .ठिकठिकाणी लहान मोठे दगड निघुन खड्डे पडतायेत. .या दुरुस्तीच्या कामासाठी वडजाई ग्रामपंचायतीला गेल्या वर्ष चौदाव्या वित्त आयोगातून दीड लाखाचा निधी उपलब्ध झाला होता . मात्र ते काम अद्याप पर्यत झालेले नाही. या बाबत वडजाई येथील ग्रामसेविका सारिका परदेशी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की वडजाईला पूर्वी अनिल सोनवणे ग्रामसेवक होते. त्याच्यावर निलंबनाची कार्यवाही झाली आहे. त्यांनी १४ व्या वित्त आयोगाचे दप्तर जमा केलेले नाही.याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना अर्ज दिलेले आहेत. दप्तर नसल्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आह.या बाबतीत ग्रामस्थांनी बिडीओना निवेदन दिलेले आहे परंतु अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Web Title: Fear of tower collapse due to lack of repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.