धुळे येथे 29 व 30 रोजी फेस्कॉमचे वार्षिक अधिवेशन

By admin | Published: April 27, 2017 04:08 PM2017-04-27T16:08:54+5:302017-04-27T16:08:54+5:30

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) 32 वे वार्षिक अधिवेशन 29 आणि 30 एप्रिल रोजी धुळ्यात होत आह़े

Fescom's annual session on 29th and 30th of Dhule | धुळे येथे 29 व 30 रोजी फेस्कॉमचे वार्षिक अधिवेशन

धुळे येथे 29 व 30 रोजी फेस्कॉमचे वार्षिक अधिवेशन

Next

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 27 -  महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) 32 वे वार्षिक अधिवेशन 29 आणि 30 एप्रिल रोजी धुळ्यात होत आह़े त्याच्या नियोजनासाठी समित्या स्थापन करण्याचे आणि बैठका घेवून सूचना देण्याचे काम सुरू असल्याची माहिती फेस्कॉमच्या खान्देश विभागाचे अध्यक्ष तथा सुकाणू समितीचे अध्यक्ष प्राचार्य व्ही़ क़े भदाणे यांनी दिली़
हे अधिवेशन राजर्षी शाहू महाराज नाटय़ मंदिरात होणार आह़े महासंघाच्या आत्तार्पयतच्या इतिहासात धुळ्याला पहिल्यांदाच संधी मिळाली आह़े दोन दिवस सुरु राहणा:या या अधिवेशनात मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या विविध विषयावर विचारमंथन होणार आह़े
अधिवेशनात फेस्कॉमचे अध्यक्ष डी़ टी़ चौधरी अध्यक्षस्थानी असतील़ रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्यावर स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आह़े केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भूसे, आमदार कुणाल पाटील, आमदार अनिल गोटे, आमदार सुधीर तांबे, आयस्कॉनचे अध्यक्ष डी़ एऩ चापके, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडकर, उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्यासह अन्य मान्यवर अधिवेशनात उपस्थित राहतील़

Web Title: Fescom's annual session on 29th and 30th of Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.