‘स्वीकृत’साठी अनेकांची फिल्डिंग
By admin | Published: January 5, 2016 12:48 AM2016-01-05T00:48:14+5:302016-01-05T00:48:14+5:30
नंदुरबार : पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्षपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.
नंदुरबार : पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्षपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. सत्ताधारी काँग्रेस गटाने दरवर्षाला स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्षपदी प्रत्येक घटकातील व्यक्तींना संधी देण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे ही निवड येत्या 15 दिवसांच्या आत होणार आहे. त्यासाठी अनेकजण इच्छुक असून कुणाची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. नंदुरबार पालिकेत काँग्रेसची एकतर्फी सत्ता आहे. 37 पैकी 36 नगरसेवक या पक्षाचे आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटातर्फे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दरवर्षी स्वीकृत नगरसेवकपदी शहरातील सर्वच समाज घटकांमधील एका व्यक्तीला संधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या तीन वर्षात 12 जणांना संधी देण्यात आली आहे. शिवाय दरवर्षी उपनगराध्यक्ष पदावर निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाला वर्षभरासाठी उपनगराध्यक्षपद देण्याचेही निश्चित केले आहे. त्यानुसार आतार्पयत तीन जणांना संधी देण्यात आली आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात निवड करण्यात आलेल्या स्वीकृत सदस्य आणि उपनगराध्यक्षपदाची मुदत येत्या आठवडय़ात संपणार आहे. त्यामुळे नवीन निवडीसाठी लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्षांचे राजीनामापत्रदेखील घेऊन ठेवण्यात आले आहे. गेल्यावर्षी स्वीकृत नगरसेवकांमध्ये रमेश पुरुषोत्तम पटेल, नरेंद्रकुमार पारसमल जैन, मोहनसिंग परदेशी व खाटीक गुलाबनबी मुसा तर उपनगराध्यक्षपदी दीपक कटारिया यांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक समाजातील एकजण या दोन्ही पदांवर निवड करण्यात येणारे हे प्रत्येक समाजातील प्रतिनिधित्व करणारे घटक असतात. उपनगराध्यक्षपदी पहिल्या वर्षी मुस्लीम समाजाला, दुस:या वर्षी मराठा समाजाला, तिस:या वर्षी सिंधी समाजाला न्याय देण्यात आला आहे. आता चौथ्या वर्षी कुठल्या समाजाला न्याय मिळतो याकडे लक्ष लागून आहे. या पदासाठी मात्र अनेकजण इच्छुक असून कुणाची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. अशाच प्रकारची संधी स्वीकृत नगरसेवकपदांसाठीदेखील दिली जाते. चार जणांची निवड स्वीकृत पदासाठी केली जाते. त्यानुसार प्रत्येक समाजातील एका व्यक्तीला यापूर्वीच आश्वासन देऊन ठेवलेले आहे. आतार्पयत 12 जणांना स्वीकृत नगरसेवकपदाचा मान मिळाला आहे. आणखी दोन वर्ष पालिकेची मुदत असल्यामुळे आणखी आठ जणांना संधी मिळणार आहे. या वर्षासाठी कुणाची वर्णी लागते याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. अनेकांची फिल्डिंग स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेकजण इच्छुक असून काहींनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संपर्क साधून इच्छादेखील व्यक्त केली आहे. एकवर्ष जरी संधी राहिली तरी एकदाचे नगरसेवकपद नावापुढे लागत असल्यामुळे अनेकांच्या मनात त्यासाठीची सुप्त इच्छा आहे. त्यामुळे इच्छुकांनी विविध माध्यमातून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अद्यापर्पयत कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. लवकरच बैठक घेऊन आमदार चंद्रकांत रघुवंशी हे नावे निश्चित करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कुणाची या पदावर वर्णी लागते याकडे सर्वाचेच लक्ष लागून आहे.