जिल्ह्यातील पंधराशे शाळा तंबाखू मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:00 PM2019-02-21T23:00:28+5:302019-02-21T23:01:16+5:30
अभियान : जिल्ह्याची अंतिम टप्प्याकडे वाटचाल
धुळे : सलाम मुंबई फाँऊन्डेशनतर्फे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचा परिसर तंबाखू मुक्त होण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे़ त्यात जिल्ह्यातील आतापर्यत सुमारे १ हजार ८३३ शाळा तंबाखु मुक्त झाल्या आहेत़
राज्यभरात तंबाखु मुक्त शाळा होण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ यामध्ये यवतमाळ, वर्धा, नंदूरबार हे जिल्हे तंबाखु मुक्त घोषित करण्यात आले आहे़ तर धुळे जिल्हा या अभियानात सध्या अंतिम टप्यात आहे़ तंबाखू मुक्त अभियानाची कार्यप्रणाली प्रभावीपणे होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्यध्यापक, शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांनी ११ निकषांची माहिती व फोटो टोब्याको फ्री स्कूल अॅपवर अपलोड करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे़
शिंदखेडा तालुक्यातील ३११, शिरपूर तालुक्यातील ४०८, साक्री तालुक्यातील ६४२, धुळे ३७५, धुळे शहरातील ८९ अशा एकूण जिल्ह्यातील आतापर्यत १ हजार ८३३ अशा
तंबाखु मुक्त झाल्या आहेत़ तर लवकरच जिल्हातील शाळा शंभर टक्के तंबाखु मुक्त होण्याकडे वाटचाल सुरू आहे़ याअभियान यशस्वीतेसाठी अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे़