माय मराठी जिवंत ठेवण्यासाठी मनपा लढा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 09:45 PM2019-12-29T21:45:16+5:302019-12-29T21:46:44+5:30

आयएसओ मानाकंनाचा दर्जा

Fight to keep my Marathi alive! | माय मराठी जिवंत ठेवण्यासाठी मनपा लढा !

Dhule

Next
ठळक मुद्देआयएसओ-२००९ मानाकंना मिळालेजिल्ह्यातील ९० हजार विद्यार्थ्याची माहिती अपलोड मुलींच्या जन्माचे स्वागत, प्रबोधन, रॅली, पथनाट्य, लोकप्रचार-प्रसार कार्यक्रमवर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी शिक्षण विभागाने मनपाकडे १ कोटी रुपयांची मागणीज्यशासनाने तेजस अभियानाचा उपक्रम सुरू

चंद्रकांत सोनार ।
धुळे : मराठी, हिंदी, उर्दू तसेच इंग्रजी भाषेसोबत विविध उपक्रम मनपा शाळेत राबविले जातात़ १०० टक्के लोकसहभागातून डिजीटल झाल्याने शासनातर्फे शाळेला आयएसओ-२००९ मानाकंना मिळाले आहे़
सेंट्रल किचन पध्दत लागू
मुलांना शालेय पोषण आहार बंद डब्यात मिळण्यासाठी नवीन वर्षापासून केंद्र सरकार व मनपाच्या विद्यमाने सेंट्रल किचन पध्दतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे़ त्यामुळे मुलांना गरम आहार मिळणार आहे़
राज्यात मनपा शाळांची नोंद
मुलांसह शिक्षकांना देखील इंग्रजी बोलता येण्यासाठी राज्यशासनाने तेजस अभियानाचा उपक्रम सुरू केला होता़ त्यात २७ जिल्ह्यामध्ये धुळे मनपा शाळांची गुणवत्तेचा विचार करून निवड झाली होती़
एका क्लिकवर माहिती.
विद्यार्थ्यांच्या पटसंख्या, गुणवत्ता, शाळेची स्थितीसह अन्य माहिती यू-डायस प्रणालीवर अपलोड करणे बंधनकारक केले आहे़ याप्रणालीची जिल्ह्यातील ९० हजार विद्यार्थ्याची माहिती अपलोड केली आहे़
वृक्ष दत्तक योजना...
झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांना एक वृक्ष दत्तक देण्यात आले होते. मुलांनी सोबत आणलेल्या बॉटलमधील उरलेले पाणी फेकून न देता या वृक्षांना देऊन जगविले आहे.
बेटी-बचाव बेटी पढाव उपक्रम
मनपा शाळेत दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या बेटी-बचाव बेटी पढाव उपक्रमाद्वारे मनपा कार्यक्षेत्रातील २९ व अंगणवाड्या व खाजगी २० शाळांमध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत, प्रबोधन, रॅली, पथनाट्य, लोकप्रचार-प्रसार कार्यक्रम राबविण्यात आले़
तंबाखू मुक्त शाळा
सलाम फॉऊडेशन व नेहरू युवा केंद्रामार्फेत राबविण्यात आलेल्या उपक्रमातून मनपा शाळेची तंबाखू मुक्त परिसर होण्याकडे वाटचाल सुरू आहे़
मराठी शाळेत इंग्रजी शिक्षण
महापालिका शिक्षण मंडळांतर्गत मराठी व उर्दू माध्यमाच्या २० शाळा आहेत़ त्यातील शाळा क्रमांक ५३, २०,२५,९, ८ व ५६ या डिजीटल झाल्या आहेत़ त्यामुळे मुलांना शाळेतून मराठी सोबत इंग्रजी शिक्षण देखील दिले जाते़
शाळा दुरूस्तीसाठीचा १ कोटीं निधीची प्रतिक्षा
शाळांची रंगरंगोटी, छत दुरूस्ती, पाण्याची टाकी, दरवाजे, खिडक्या दुरूस्ती, वर्गखोल्यांवर फायबर पत्रे, स्वच्छतागृहे व शौचालये यांची दुरूस्ती, फळ्याची निर्मिती, वर्गखोल्यांच्या दुरूस्तीसाठी शिक्षण विभागाने मनपाकडे १ कोटी रुपयांची मागणी केली आहे़ मात्र मनपाकडून निधी मिळत नसल्याने मुलांना समस्यांना सामारे जावे लागत आहे़

Web Title: Fight to keep my Marathi alive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे