उपजिल्हाधिका-यांसह १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 10:09 PM2018-06-14T22:09:56+5:302018-06-14T22:09:56+5:30

विखरणच्या सुनील पाटील यांचा दोंडाईचा पोलिसात तक्रारी अर्ज

File the case against 13 people along with Sub-District | उपजिल्हाधिका-यांसह १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करा

उपजिल्हाधिका-यांसह १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करा

googlenewsNext
ठळक मुद्दे- औष्णिक वीज प्रकल्पासाठी जमीन संपादन- अधिकाराचा गैरवापर करून शासनाची फसवणूक- गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  औष्णिक ऊर्जा प्रकल्पात शेतजमीन संपादन करतांना खोटे,बनावट दस्ताऐवज करून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी, कृषी, महाजनको,  भूमी अभिलेखा विभागाचे अधिकारी आणि कासारे ता.साक्रीचा एजंट अशा १३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा तक्रारी अर्ज    विखरण येथील सामाजिक कार्यकर्ते   सुनील भटा पाटील  यांनी दोडाईचा पोलिसात  दिला आहे.
तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील हे नरेंद्र धर्मा पाटील यांचे चुलत भाऊ आहेत. शिंदखेडा तालुक्यातील  विखरण येथील औष्णिक  ऊर्जा प्रकल्पासाठी शेत जमीन संपादीत करण्यात आली.त्यात विखरण येथील गट नम्बर ब२९०/३, गट नं २२७/१,  व गट नं २२७/२ यात   बनावट अभिलेख,   फळबाग मूल्यांकन अहवाल  व इतर दस्ताऐवज तयार केले.   तसेच शासकीय अधिकारी लोकसेवक असताना त्या अधिकाराचा गैरवापर  करुन शासनाची फसवणूक  करुन निधीचा  अपहार केला. तर एजंटने  शासकीय अधिकारी, लोकसेवक  यांच्याशी हातमिळवणी करून निधीचा अपहार केला. म्हणून याप्रकरणी भूसंपादन उपजिल्हाधिकारी पी.व्ही.सपकाळ, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, कृषी अधिकारी डॉ बबन पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी पी एम सोनवणे, शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, उपअधीक्षक शिंदखेडा जे एस राठोड, कनिष्ठ लिपिक एन आर शेळके, तात्कालीन भूमापक,  विखरण मंडळ अधिकारी आर ए नांदोळे,  विखरण तलाठी आर बी खैरनार, कनिष्ठ  अभियंता जितेंद्र पवार, धुळे महाजनको कनिष्ठ अभियंता  अजय मांजरेकर  व लोकसेवक  तसेच  भूसंपादन एजन्ट डी जे देसले  अशा १३  जणांविरोधात  भादंवि कलम ४२०, १६७, ४०६, ४०९, ४६७, ४६८, ४७१ आणि १२० ब अन्वये गुन्हा दाखल करावा, असा अर्ज विखरणचे सुनिल भटा पाटील यांनी बुधवारी दुपारी दोंडाईचा पोलीस स्टेशनला दिला.

Web Title: File the case against 13 people along with Sub-District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.