अखेर चंदू परतला, बोरविहीरला ‘दिवाळी’!
By admin | Published: January 22, 2017 12:03 AM2017-01-22T00:03:49+5:302017-01-22T00:03:49+5:30
धुळे : नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांची शनिवारी पाकिस्तानने सुटका केली़
धुळे : नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांची शनिवारी पाकिस्तानने सुटका केली़ त्यानंतर त्यांच्या बोरविहीर या गावी जल्लोष करण्यात आला़ चंदू पाकिस्तानात गेल्याचे समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती; मात्र आता खरी दिवाळी साजरी करू, अशी भावना बोरविहीर ग्रामस्थांनी व्यक्त केली़
गावात अपूर्व उत्साह
टीव्हीवर चंदूचे वृत्त पाहून ग्रामस्थ एकमेकांना सांगत होते तर तरुणाईकडून त्याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर टाकण्यात येत होत़े प्रत्येक जण चंदूच्या सुटकेचे वृत्त एकमेकांना सांगण्यास उत्सुक असल्याचे दिसून आल़े
नातेवाइकांनाही लागली ओढ
जवळच्या नातेवाइकांनी तत्काळ बोरविहीर गाठले तर दूरवर राहणा:या नातेवाइकांनी फोनवर विचारणा केली़ चंदू यांचे मोठे भाऊ भूषण हे सुटी काढून बोरविहीरला आले असल्याने प्रत्येक जण त्यांची भेट घेत होता़ चंदू गावी कधी परतणार याबाबत विचारणा होत होती़
अधिका:यांकडून अभिनंदन
जिल्ह्यातील वरिष्ठ अधिका:यांनी चंदू यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केल़े मात्र कुणी अधिकारी बोरविहीर येथे आले नसल्याचे सांगण्यात आल़े राजकीय पदाधिका:यांनीदेखील चंदूच्या कुटुंबीयांशी संवाद साधला़
दुपारपासून रात्रीर्पयत चंदू यांचे घर गजबजलेले होत़े अचानक आलेले वृत्त खरे आहे किंवा नाही याची अनेकांकडून खात्री करून घेतली जात होती़
भाच्यालाही प्रतीक्षा
चंदू चव्हाण पाकिस्तानात गेल्याचे स्पष्ट झाले त्याच दिवशी त्यांची बहीण रूपाली यांना इंदूर येथे पुत्ररत्न झाले होत़े त्यामुळे मामाच्या भेटीची भाच्यालादेखील प्रतीक्षा लागून आह़े