अखेर अध्ययन केंद्र जमीनदोस्त!
By admin | Published: January 13, 2017 12:05 AM2017-01-13T00:05:11+5:302017-01-13T00:05:11+5:30
महापालिका : पोलीस बंदोबस्तात कारवाई, भगव्या चौकातील शिवसेना कार्यालयाला सूचना
धुळे : मनपाशेजारी असलेले डॉ़ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र अखेर गुरुवारी मनपाने जमीनदोस्त केल़े चोख पोलीस बंदोबस्तात दोन जेसीबींच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली़ त्यानंतर लागलीच याठिकाणी रस्ता तयार करण्यात आला़ एकीकडे ही कारवाई सुरू असतानाच मनपा अतिक्रमण निमरूलन पथकाने भगव्या चौकातील शिवसेना कार्यालय स्वत:हून काढून घेण्याबाबत तोंडी सूचित केले आह़े
आमदार अनिल गोटे यांनी 19 अतिक्रमणांबाबत मनपाकडे तक्रार केली असून त्यानुसार मनपातर्फे कारवाई सुरू आह़े दरम्यान, मनपाशेजारी असलेल्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्रावरून सुरू असलेला वाद अखेर बुधवारी संपुष्टात आला होता़ अध्ययन केंद्राच्या पदाधिका:यांनी केंद्राची जागा गुरुवारी सकाळपासून रिक्त करून देत असल्याचे सायंकाळी जाहीर केले होत़े त्यानुसार गुरुवारी सकाळी नऊ वाजता मनपाचे पथक बांधकाम काढण्यासाठी दाखल झाल़े यावेळी अध्ययन केंद्रासमोरील रस्ता पोलिसांनी दोन्ही बाजूने बंद केला होता़ दोन जेसीबींच्या साहाय्याने अखेर अध्ययन केंद्र जमीनदोस्त करण्यात आल़े यावेळी अध्ययन केंद्राचे अध्यक्ष एम़जी़ धिवरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत़े बांधकाम पाडल्यानंतर लागलीच रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली़ सदर रस्त्यासाठी सव्वादोन लाख रुपयांचा निधी आधीच मंजूर करण्यात आला होता़ त्यानुसार सायंकाळर्पयत रस्ता तयार करण्याचे काम सुरू होत़े मनपाचे कार्यकारी अभियंता अनिल पगार, शहर अभियंता कैलास शिंदे, चंद्रकांत उगले, पी़डी़चव्हाण, नंदकुमार बैसाण उपस्थित होत़े