अखेर भुयारी गटार योजना दृष्टिपथात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2017 12:29 AM2017-03-19T00:29:35+5:302017-03-19T00:29:35+5:30

महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजना यापूर्वी केंद्र शासनाकडून नाकारण्यात आली होती़ मात्र नगरपरिषद संचालनालयाने महापालिकेस ही योजना दुसºया अभियानातून राबविण्याबाबत सूचित केले होते़

Finally, the subway drainage scheme is in sight! | अखेर भुयारी गटार योजना दृष्टिपथात!

अखेर भुयारी गटार योजना दृष्टिपथात!

googlenewsNext


धुळे : महापालिका क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजना यापूर्वी केंद्र शासनाकडून नाकारण्यात आली होती़ मात्र नगरपरिषद संचालनालयाने महापालिकेस ही योजना दुसºया अभियानातून राबविण्याबाबत सूचित केले होते़ त्यानुसार मनपाने पाठविलेल्या २०१ कोटींच्या प्रस्तावाचा समावेश अमृत अभियानात करण्यात येणार असून तशी तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहिती मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सूत्रांनी दिली़
नगरपरिषद संचालनालयाने मनपाला दिलेल्या प्रस्तावानुसार अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम फॉर स्मॉल अ‍ॅण्ड मेडियम टाऊन (यूआयडीएसएसएमटी) योजनेंतर्गत महापालिकेने १९२.०४ कोटींच्या निधीची भुयारी गटार योजना मंजुरीसाठी प्रस्ताव २०१३ मध्ये सादर केला होता़ तथापि, मार्च २०१४ मध्ये नगरविकास विभागाने या योजनेत नव्याने कोणताही प्रकल्प सादर करू नये, अशी सूचना दिली होती़ त्यामुळे महापालिकेची भुयारी गटार योजना केंद्राकडे  सादर करता येणार नाही. ही योजना इतर योजना अथवा अभियानातून राबवावी, असे स्पष्ट करण्यात आले होते़
नवीन प्रस्ताव केला सादर
दरम्यान, सदरच्या पत्रानंतर मनपाने सुधारित २०१ कोटींचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी घेऊन शासनाला सादर केला होता़ या प्रस्तावासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांचा पाठपुरावा सुरू होता़ त्याचप्रमाणे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून शहरातील व पांझरा नदी परिसरातील गावांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला होता़ त्यावर मुख्यमंत्र्यांनी अमृत योजनेत या प्रकल्पाचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते़ त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ९० कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़  गेल्या महिनाभरापासून शासनाने अमृत योजनेशी संबंधित माहिती महापालिकेकडून मागविली होती़ त्यानुसार भुयारी गटारी योजनेच्या प्रस्तावाची माहितीदेखील शासनाला सादर करण्यात आली होती़
 

Web Title: Finally, the subway drainage scheme is in sight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.