अखेर अमरावती धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 10:54 PM2019-08-27T22:54:29+5:302019-08-27T22:54:55+5:30

मालपूर  : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पाणी सोडण्याचा घेतला निर्णय

Finally the water released from the Amravati Dam | अखेर अमरावती धरणातून सोडले पाणी

अमरावती प्रकल्पातून पाणी सोडतांना पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मालपूरचे ग्रामस्थ

googlenewsNext

मालपूर : अमरावती मध्यम प्रकल्पाच्या  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने, धरणातील जलसाठ्यात वाढ होणार असल्याने, या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सोडण्यात आले. 
अमरावती धरण शंभर टक्के भरल्याशिवाय एक थेंब देखील पाणी सोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत मालपूर (ता. शिंदखेडा) येथील शेतकºयांनी सोमवारी अमरावती धरणाच्या गेटजवळ ठिय्या आंदोलन करीत पाणी सोडण्यास विरोध केला होता.  दरम्यान अमरावती प्रकल्पातील जलसाठ्यात जलदगतीने वाढ होत असल्याने, पाटबंधारे विभागाचे प्रभारी अभियंता प्रशांत खैरनार, उपअभियंता जी.एम. शेख यांनी मंगळवारी सकाळी प्रकल्पावर येऊन पहाणी केली. सकाळी ९ वाजेपर्यंत या प्रकल्पात २२५.१५ मीटर जलसाठा होता.  शासन निर्णयानुसार तो साठा  १० सप्टेंबरपर्यंत २२४.४५ एवढाच ठेवावा लागणार आहे. शिवाय धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने आणखी जलसाठ्यात वाढ होणार असल्याचे गांभीर्य ओळखून या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून १५ से.मी.ने दरवाजे वर करून पाणी सोडण्यात आले. 
यावेळी लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे, विखरणचे सरपंच महेंद्र पवार, उपसरपंच उमेश पाटील, मालपूरचे ग्रा.प. सदस्य अरूण धनगर, बापू शिंदे, संतोष कोळी, तुकाराम माळी, भूषण रावल, पोलीस पाटील बापू बागूल, जगदीश खंडेराय, सुरेश पाटील, मगन चौधरी, आदी उपस्थित होते. 

Web Title: Finally the water released from the Amravati Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे