लुटीच्या इराद्याने केला कारवर फायर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 09:51 PM2019-09-21T21:51:40+5:302019-09-21T21:51:59+5:30

वरखेडी पुलावरील घटना : तिघा संशयितांविरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा

Fire on a banana car intended to rob | लुटीच्या इराद्याने केला कारवर फायर

लुटीच्या इराद्याने केला कारवर फायर

Next

धुळे : महामार्गावरुन जाणाºया कारवर गावठी कट्यातून गोळी झाडून चालकाला बंदुकीचा धाक दाखवत ५ लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न शनिवारी पहाटेच्या सुमारास झाला़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार आल्याने तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ दरम्यान, या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही़ घटनेनंतर मात्र बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ 
गुजरातमधील म्हैसाणा जिल्ह्यातील लक्ष्मीपुरा येथील      कौशिक माणिकलाल पटेल हा ३६ वर्षीय चालक एमएच १९ बीयु ४९३१ या नंबरच्या कारने साथीदारांसह इंदूर येथून मुंबईकडे जात होता़ धुळ्यानजिक मुंबई आग्रा महामार्गावरील वरखेडी पुलावरुन जात असताना शनिवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास गावठी कट्याने गोळी झाडण्यात आली़ तसेच मागावून भरधाव वेगात आलेली लाल रंगाची कार आडवी लावून त्यातून उतरलेल्या तिघा अनोळखींनी चालकाला गावठी कट्याचा धाक दाखविला़ चालकाजवळ असलेले ५ लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न केला़ या घटनेनंतर चालकाने मालकाला कळविले़ याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देखील नोंदविली़ त्यानुसार, विविध कलमान्वये तिघा अनोळखी जणाविरुध्द गुन्हा दाखल झाला़ 
या अनोळखी तिघांचे वर्णन चालकाने पोलिसांना सांगितले़ त्या अनुषंगाने पोलिसांकडून शोध सुरु झाला आहे़ 
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझादनगर पोलीस   निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली़ घटनेबाबत वरिष्ठांनी चालकाकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे़ पोलीस निरीक्षक दिनेश आहेर घटनेचा तपास करीत आहेत़ 
सुदैवाने जीवितहानी टळली
अचानक गावठी कट्यातून झालेल्या फायरमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ या फायरमुळे सुदैवाने कोणाची जीवितहानी झालेली नाही़ अथवा कुणाला दुखापत देखील झालेली नाही़ या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मात्र तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते़ तपास सुरु झाला आहे़ 

Web Title: Fire on a banana car intended to rob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.