अग्निशमन बंबांवर पाणीवाटपाची वेळ!
By admin | Published: May 29, 2017 01:05 AM2017-05-29T01:05:47+5:302017-05-29T01:05:47+5:30
महापालिका : टँकर खरेदी होईना, आग विझविण्यासाठी केवळ दोन बंबांवरच भिस्त
धुळे : महापालिकेची टँकर खरेदी रखडल्याने अग्निशमन विभागाच्या बंबांवर लग्नकार्यात पाणीवाटपाची वेळ आली असून, आग विझविण्याची पूर्ण वेळ जबाबदारी केवळ दोन बंब पार पाडत असल्याचे समोर आले आह़े त्यामुळे टँकर खरेदी कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला आह़े
मनपा मालकीच्या एकमेव टँकरचा केवळ सांगाडाच उरल्याने त्यात भरलेले 80 टक्के पाणी गळून जात होत़े त्यामुळे गेल्या वर्षाच्या सुरुवातीस झालेल्या महासभेत गळक्या टँकरच्या विषयावरून प्रशासनाला जाब विचारून नवीन टँकर घेण्याची मागणी करण्यात आली होती़ त्यानंतर झालेल्या स्थायी समितीच्या सभेत टँकर, कचरा उचलणारे वाहन व जेसीबी खरेदीचा ठरावही करण्यात आला़ मात्र आतार्पयत खरेदी होऊ शकलेली नाही़
मनपा अग्निशमन विभागात एकूण पाच बंब असून त्यापैकी दोन बंब आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नेहमी सज्ज असतात़ तर दोन बंब दहा वर्षापूर्वीचे असून ते पाणीवाटपासाठी देण्यात आले आहेत़ उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने नागरिकांना या बंबांद्वारे पाणी पुरविले जाते. त्याचप्रमाणे लग्नसराईमुळे विविध कार्यक्रमांमध्येदेखील पाणी पुरविण्याची जबाबदारी अग्निशमन दलाच्या बंबांना पार पाडावी लागत आह़े त्याचप्रमाणे शहरातील विविध पाणपोई, महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता, उद्यानांनाही हे बंब पाणी पुरवित असतात़ मनपाच्या पांझरा जलकेंद्रातून एक टँकर (बंब) पाण्यासाठी 500 रुपये आकारणी केली जाते, तर नगरसेवकांनी मागणी केल्यास त्यांच्या नावावर पाणी नेल्याची नोंद केली जाते व निवडणुकीपूर्वी तो खर्च वसूल केला जातो़ मात्र अनेकांकडून दादागिरी करून टँकर भरून नेले जात असून खासगी टँकरही सहजपणे पांझरा जलकेंद्रातून भरून नेले जातात. तसेच त्यांची नोंदही ठेवली जात नाही़ त्यामुळे नियमांचे पालन होणे आवश्यक आह़े अन्य एका बंबाचा गेल्या महिन्यात अपघात झाल्यामुळे तो तात्पुरत्या वापरासाठी ठेवण्यात आला आह़े त्याचप्रमाणे आताच नव्याने एका चेसिसची खरेदी करण्यात आली असून बंब तयार केला जाणार आह़े परंतु त्यासाठी कालावधी लागेल़ याव्यतिरिक्त एक लहान जीपही अग्निशमन विभागात आह़े परंतु किरकोळ दुरुस्त्यांमुळे वर्षभरापासून ही जीप धूळखात पडून आह़े शहरात अरुंद गल्लीबोळांमध्ये आग लागल्यास जीपचा वापर होऊ शकतो. परंतु त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आह़े अग्निशमन विभागात सध्या 35 कर्मचारी असून रिक्त पदे भरणे आवश्यक आह़े