पाणी योजनेबाबत पहिले दोषारोपपत्र!

By Admin | Published: March 18, 2017 12:17 AM2017-03-18T00:17:54+5:302017-03-18T00:17:54+5:30

१३६ कोटींची पाणी योजना : चौकशीनंतर तत्कालीन मुख्य लेखाधिकाºयांवर ठपका

First charge sheet against water scheme! | पाणी योजनेबाबत पहिले दोषारोपपत्र!

पाणी योजनेबाबत पहिले दोषारोपपत्र!

googlenewsNext


धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटी रुपयांच्या पाणी योजनेप्रश्नी शुक्रवारी शासनाच्या मागणीनुसार तत्कालीन मुख्य लेखाधिकारी केशव कुटे यांच्यावरील दोषारोपपत्र महापालिकेने शासनाला सादर केले़ १३६ कोटींच्या पाणी योजनेबाबत हे पहिलेच दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे़ या दोषारोपपत्रावर कुटे यांना १० दिवसांत लेखी खुलासा सादर करावा लागणार आहे़
असे आहेत दोषारोप
१३६ कोटींच्या पाणी योजनेची पहिली निविदा व चौथी निविदा यात ३ कोटी ९८ लाख १४ हजार ४९२ रुपयांची तफावत असणे़, योजनेतील मूळ संकल्पनेत व नवीन पूर्ण संकल्पनेच्या किमतीतील फरक तपासणे गरजेचे आहे़, पाणी योजनेत प्रस्तावित ९ जलकुंभांपैकी ६ जलकुंभांची किंमत १० कोटी ३१ लाख ५६ हजार दर्शविण्यात आली असून शेड्युल ब मध्ये या टाक्यांच्या किमतीची बेरीज ६ कोटी २५ लाख ३० हजार रुपये येते़  त्यामुळे या कामात ४ कोटी १६ लाख रुपयांची तफावत आहे, अग्रीम रक्कम १५ कोटी ही स्वीकृत निविदेच्या १० टक्के देण्यात आली आहे़ निविदेतील अटी व शर्तीनुसार व मनपासोबत झालेल्या करारानुसार निविदा रकमेच्या १० टक्के रक्कम १० टक्के व्याजदराने देय आहे़ मात्र, मोबिलायझेशन अग्रीमचा व्याजदर व निविदेवेळचा व्याजदर विचारात घेतला असता, या व्याजदरातील फरकामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले नसते. जर १८ टक्के व्याजाने अग्रीम रक्कम दिली असती तर ८ टक्केनुसार प्रथम व दुसºया धावत्या देयकांतर्गत ७६ लाख ८३ हजार इतकी रक्कम धुळे मनपास मिळाली असती़ एकूण मोबिलायझेशन अग्रीम वसूल होईपर्यंत सदर व्याजाची परिगणना केली असता ती चढत्या क्रमाने जास्त होईल, कंत्राटदाराने प्रथम देयकापर्यंत १२३ किमी लांबीचे पाईप हे निविदेतील नमूद बनावटीचे न आणल्यामुळे २ कोटी ९३ लाख ५ हजार ९३२ रुपयांचा भार योजनेवर पडला आहे, प्रथम व द्वितीय देयकात मिळून १४ कोटी १२ लाख या रकमेची रोडबॉक्स खरेदी करण्यात आली असली तरी कामाचे योग्य नियोजन न झाल्याने व साहित्य योग्य बनावटीचे नसल्याने १४ कोटी १२ लाख रुपयांचा भार योजनेवर पडला आहे, वितरण व्यवस्थेच्या कामांतर्गत मुरूम बेंडिंगसाठी कंत्राटदारास २८ कोटी ४७ लाख एवढी रक्कम अदा करण्यात आली आहे, प्रत्यक्षात चार झोनमध्ये घेण्यात आलेल्या ट्रायल पिटस्मध्ये मोजलेल्या खोलीची सरासरी व परिणाम काढले असता ९ लाख ४० हजार ६८८ रुपये एजन्सीला जास्त देण्यात आले आहे, कंत्राटदाराने एकूण ३ हजार ७९० मी़ पाईपलाईनचे काम निकृष्ट केले असून प्रत्यक्ष पाहणी दौºयात १ हजार १९८ मी. एवढ्या लांबीचे देयक अदा झाल्याचे दिसून आले आहे़ तसेच प्रायमो कंपनीनेदेखील ही बाब निदर्शनास आणून दिली आहे़  त्यामुळे १ कोटी ८४ लाख ८८३ रुपये जास्तीची रक्कम कंत्राटदारास अदा झाली आहे, कामाची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी असलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांच्या कामाच्या पद्धतीत त्रुटी आढळून येत असून त्यामुळे ४ लाख २० हजार २३३ रुपयांचे नुकसान झाले आहे, कंत्राटदाराने ५०० मि.मी. व्यासाच्या ८३ मीटर लांबीच्या पाईपांचा जादा पुरवठा केल्याने ३ लाख १० हजार ३६३ रुपयांचे नुकसान झाले़
आमदार गोटेंची होती तक्रार
१३६ कोटींच्या पाणी योजनेबाबत आमदार अनिल गोटे यांनी तक्रार केली होती़ गोटे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या गुणवत्ता व परीक्षण समितीच्या अधीक्षक अभियंता मनीषा पलांडे, उपअभियंता एस़जी़माने व शाखा अभियंता जुवेकर यांनी पाणी योजनेच्या कामांची धुळ्यात येऊन पाहणी केली होती़ पलांडे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात पाणी योजनेच्या कामावर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले असून त्यानुषंगाने चौकशी सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे कुटे यांच्यावरील दोषारोपपत्रासह मनीषा पलांडे यांनी सादर केलेला चौकशी अहवाल पाठविण्यात आला आहे़ केशव कुटे यांच्या कामावर आक्षेप घेण्यात आल्याने त्यांची औरंगाबाद येथे बदली झाली होती़ त्या वेळी अनेक वादविवादही झाले होते़

अन्य अधिकाºयांचीही चौकशी?

१३६ कोटींच्या पाणी योजनेत अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले असल्याने योजनेच्या कामात दोषी अन्य अधिकाºयांवरही भविष्यात कारवाई होऊ शकते़ गेल्या महासभेत, पाणी योजनेच्या अहवालाबाबत आयुक्त कारवाई करीत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती़ त्यानंतर मनपाकडून शासनाच्या मागणीनुसार पाणी योजनेच्या गैरव्यवहाराबाबत पहिले दोषारोपपत्र शासनाला सादर झाले आहे़

Web Title: First charge sheet against water scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.