धुळ्यात साकारले देशातील पहिले स्वदेशी विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 01:12 PM2020-08-22T13:12:30+5:302020-08-22T13:13:24+5:30

महाराष्ट्राच्या तरूणाची संकल्पना : घराच्या छतावर झाले विमानाच्या निमित्तीला सुरूवात ; केद्र सरकारकडून पाहणी

The first indigenous aircraft in Dhule | धुळ्यात साकारले देशातील पहिले स्वदेशी विमान

dhule

googlenewsNext

चंद्रकांत सोनार ।

धुळे : 'मेक इन इंडिया' च्या धर्तीवर आपल्या स्वदेशी विमान तयार करण्याची संकल्पना महाराष्ट्रातील नव उद्योजक अमोल यादव यांनी मनात ठेवून तब्बल १९ वर्षांच्या प्रयत्नातून देशातील पहिले सहा आसणी स्वदेशी विमानाची निर्मिती केली आहे.
देशात सध्यस्थितीत एकही विमान तयार केले जात नाही़ त्यामुळे भारताला अन्य देशातून मदत घेऊन विमान खरेदी करावे लागते़ भारताचे स्वदेशी प्रशिक्षण विमान असावे अशी अशा मनात ठेवून नवउद्योजक अमोल यादव यांनी मुंबई येथील आपल्या राहत्या घरातील छतावर प्रशिक्षण विमान निमित्तीला सुरूवात केली होती़ विमानाचा आकारात वाढू लागण्याचे छत कमी पडू लागल्याने अमोल यादव यांनी धुळ्यातील गोंदूर येथील बॉम्बे फ्लाईग क्लबचे कप्टन जे़ पी़ शर्मा यांच्याशी संपर्क साधून स्वदेशी प्रशिक्षण विमान तयार करण्यासाठी मदत मागितली़
त्यानुसार कप्टन जे़पी़ शर्मा यांनी गोंदूर विमानतळावरील जागा व यंत्रणा उपलब्ध करून दिली़ त्यानंतर तब्बल साडेतीन वर्षानंतर निर्मितीचे कामकाज पूर्णत्वास आले़ धुळ्यात निमित्ती झालेले सहा आसणी स्वदेशी विमान हे देशातील पहिले विमान असणार आहे़ स्वदेशी विमान असल्याने भविष्यात भारताला अन्य देशातून प्रशिक्षण विमान खरेदी करण्याची गरज भासणार नाही़ असा विश्वास नवउद्योजक अमोल यादव यांनी व्यक्त केला आहे.
विमानाची जमिनीवरील उड्डान झाली पूर्ण....
अमोल यादव यांनी तयार केलेले विमानाची नुकतीच जमिनीवरील उड्डान पूर्ण झालेली आहे़ तसेच विमानाची चाचणी कप्टन जे़पी़शर्मा यांनी घेतली आहे़ या विमानाने पहिला चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे़ त्यामुळे अनेकांनी यादव निमित्ती केलेल्या विमानाचे कौतूक केले आहे़
हवाई उड्डानाची परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू..
पहिली चाचणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच हे विमान हवाई उड्डान करणार आहे़ मात्र हवाई उड्डान करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी घ्यावी लागणार आहे़ त्यासाठी गोंदूर येथील विमानतळावर केंद्र सरकारचे पथकाने भेट देऊन विमानाची पाहणी करून तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठविणार आहे़

Web Title: The first indigenous aircraft in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे