दहा गावांना मनपाच्या निवडणूकीत मतदानाची पहिलीचं संधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 09:59 PM2018-11-24T21:59:11+5:302018-11-24T22:00:06+5:30

नव्या प्रभागात प्रचार : वलवाडी, भोकर मोराण्यातील माजी उपसरंपच, ग्रा़प़सदस्य नगरसेवक पदाच्या रिंंगणात

The first opportunity for the 10 villages to win the MMC election | दहा गावांना मनपाच्या निवडणूकीत मतदानाची पहिलीचं संधी 

दहा गावांना मनपाच्या निवडणूकीत मतदानाची पहिलीचं संधी 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणूकीपूर्वी तालुक्यातील दहा गावांचा समावेश शहरात झाल्यामुळे नव्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांला देखील उमेदवारीची संधी मिळणार असल्याने राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाने निष्ठावंत व नव्या पाट्या हद्दवाढीच्या गावातून दिल्या आहेत़ 
राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाला सदस्यांची होणार मदत 
महापालिका, जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी- कॉंग्रेस पक्षाची सत्ता  असल्याने दोन्ही पक्षाचे जिल्हात  जि़ प़ आणि प़ स़ सदस्य असल्याने मनपाच्या हद्दवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेवाराच्या प्रचारासाठी मेहनत घेण्याची गरज नाही़  राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद गट आणि गणाच्या अभ्यास करून त्या प्रभागात उमेदवार दिला आहे़ त्यामुळे मनपा निवडणूकीत स्थानिक जिल्हा परिषदव पंचायत समिती सदस्यांची उमेदवाराला मदत होणार आहे़ 
उमेदवारांना प्रचारासाठी करावी लागणार कसरत 
 महापालिका हद्वाढ होण्यापूर्वी शहरात ३५ प्रभागात दोन उमेदवार असे ३५ उमेदवार पक्षाकडून दिले जात होते़ त्यामुळे उमेदवाराचा प्रभागात जनसंपर्क असल्याने विजय होण्याची जास्त मेहनत घेण्याची गरज भासत नव्हती़ मात्र महापालिका निवडणुकापूर्वी शहराची हद्दवाढ झाल्याने वलवाडी, भोकर, मंहिदळे, नकाणे, अवधान, बाळापूर अशी दहा गावांचा समावेश शहरात करण्यात आली़  त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत १९ प्रभागासाठी ७४ उमेदवार रिंंगणात आहेत़ शहरापासून वलवाडी ८.३२, मोराणे ८़१९, महिंदळे ६़९७ ,नगाव ६़४६ अंतरावर आहेत़ त्यामुळे वेळ, पैसा आणि मतदारापर्यत  उमेदवारांचा जनसंपर्क  नसल्याने उमेदवारांला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे़  
पाच गावातील ग्रा़.प़ सदस्य नगसेवक पदाच्या रिंणगात 
महापालिका निवडणूकीपूर्वी शहराचे हद्दवाढ झाल्याने दहा गावे शहराला जोडण्यात आली आहे़ त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातर्फे वलवाडी ग्राम पंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, माजी उपसरपंच मुकेश खरात यांच्या पत्नी कल्पना मुकेश खरात, मोराणे ग्रा़प़सदस्य मयुर ठाकरे, भोकर माजी ग्रा़प़सदस्य अशोक पाटील यांच्या पत्नी शोभाबाई पाटील आदी  उमेदवार राष्ट्रवादी- कॉंग्रेस पक्षातर्फे पहिल्यादाच नगरसेवक पदाच्या निवडणूकीच्या रिंगणात आहेतग़्रा़प़सदस्यांना नगसेवकांची संधी 
ग्रा़.प़. सदस्यांना नगसेवकांची संधी 
महानगरपालिका हद्दीतील उमेदवाराला नगरसेवक पदासाठी उमेदवारी करता येते़ तर ग्रामीण भागातील व्यक्तीला ग्रा़प़सह अन्य निवडणूक लढविता येतात़ दरम्यान मनपाच्या हद्दवाढीमुळे  दहा गाव जोडण्यात आली आहे़ त्यामुळे  ग्रामपंचायत सदस्यांना पहिल्यादा ग्रामपंचायत सदस्यांएैवजी आता नगसेवक पदासाठी उमेदवारी करण्याची संधी मिळाली आहे़ 
 

Web Title: The first opportunity for the 10 villages to win the MMC election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे